पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४०)
रामराज्य

हा शब्दच अत्युत्तम राज्यव्यवस्थेचा दर्शक होऊन बसला आहे. सौख्य व समृद्धि यांच्या योगानें प्रजाजन उल्हसित असत. वडीलजन, मातापितर, गुरु व इतर वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध लोकांबद्दल समाजांत पूज्य भाव असे. एक दुस- ज्याशीं प्रेमानें वागे. कवीच्या अलंकारिक भाषेत सांगावयाचें म्हणजे त्या कालीं सृष्टिनियमानुसार अंगीं असणारे दुर्गुण देखील नाहींसे होऊन वाघ व गाई एकाच पात्रांत जलपान करीत. यथाकाल पर्जन्यवृष्टि व निरालस्यानें चालवि •लेले धनोत्पादक व्यवसाय यांच्यामुळे देशांत सुबत्ता नांदे व लोक सौख्याचा आस्वाद दीर्घ काल घेत. अपमृत्यु व अकालिक मरण यांच्या बाधेपासून लोक मुक्त असत. एकदां मात्र एका ब्राह्मणाचा पुत्र अकालीं मरण पावला, तेव्हां त्या- बद्दल रामापाशीं कागाळी आली. रामानें लागलीच चौकशी करून त्या अनर्थाचें कारण शंबुक नांवाच्या शुद्राची तपश्चर्या आहे असे ठरविलें, व त्यास देहान्त प्रायश्चित्त दिलें. यावरून असे सिद्ध होतें कीं, धर्माचें नियमन राजाज्ञेने होत असे. ब्राह्मणादि चातुर्वर्णांची धार्मिक कर्तव्यकमें ठरून गेली होती व त्यांच्यापासून परावृत्त होऊन भलत्याच पथानें जाणारास शिक्षा ठरलेल्या असून, त्यांची अंमल- बजावणी करणें हें राजाचें कर्तव्य होतें. राजाच्या वर्तनावर प्रजेचें वर्तन अवलंवून असतें, असें राम समजत असे; म्हणूनच त्यानें प्रजेस चांगला धडा घालून देण्या- साठी अत्यंत कष्टप्रद असे प्रसंग स्वतःवर ओढवून घेतले; युवराजराज्याभिषे काच्या प्रसंगी सिंहासनाचा त्याग करून अरण्यवास पत्करला. रावणानें सीतेस हरण केल्यावर जिच्या प्राप्तीसाठी त्यानें लंकेस जाण्याचें व भयंकर राक्षसांशीं वानरसैन्य घेऊन झुंजण्याचें धाडस केलें, त्याच सीतेचा प्रजेंतील एका क्षुद्र व्यक्तीचें समाधान करण्यासाठी त्यानें एकदम त्याग केला. रामाचा वंश सीतेच्या उदरीं होता. अशा नाजुक स्थितींत सोतेचा त्याग करणें हें व्यावहारिकदृष्ट्या निष्ठुरपणाचें कृत्य खरें, तथापि ज्या नीतित्त्वाच्या अनुरोधानें जाण्याचें खडतर असिधारा व्रत रामानें पतकरिलें होतें त्या तत्त्वाचा विचार केला असतां त्याचें वर्तन योग्य होतें असेंच ह्मणावें लागेल. सत्यानें व धर्मानें वागणे आणि प्रजेचें रक्षण व आराधन करणें, या नीतितत्त्वांस धरून राम सदोदित पाऊल टाकीत असे.. रावण जेव्हां लढाईत ठार झाला तेव्हां राम म्हणाला "बिभीषणा, रणांत जय किंवा अपजय ठरलेलाच आहे, परंतु हा तुझा शूर भ्राता पराक्रम करून रणांत मेला