पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४१)

आहे, क्षत्रिय वीराला असेच मरण योग्य आहे. अशा मरणाबद्दल शोक न करितां आनंद मानावा. तेव्हां शोक न करतां पुढच्या विधीच्या तजविजीस लाग. आमचें वैर याच्या मरणाबरोबर संपलें. जसा तुझा तो भाऊ आहे तसा माझाही आहे." यावरून रामाच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. सुवर्णमय लंका हस्त- गत झाली, परंतु तिचा लोभ न धरितां ती एकदम बिभीषणाच्या हवाली करणा शूराची निर्लोभता अवर्णनीय आहे. शेवटी ज्या लक्ष्मणास जिवापली- कडे तो जपत असे त्याला एकदम हद्दपार करून आपण यतीस दिलेले वचन रामानें खरें केलें. या एकंदर कृत्यांचा शांतपणें विचार केला असतां असे दिसून येईल कीं, रामाचें वर्तन ज्या उदात्त नीतितत्त्वांवर अवलंबून होतें त्या तत्त्वांस अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगींही त्यानें टाकून दिलें नाहीं. असो.

रामायणकालीन स्त्रिया

 

कोणत्या प्रकारच्या होत्या यासंबंधाची उदाहरणें म्हनलीं म्हणजे सीता, मंदोदरी, तारा, कौसल्या व कैकयी यांचीं होत. रायायणांतील स्त्रिया स्थिरबुद्धीच्या, धर्म- परायण, कोमल अंतःकरणाच्या व सर्वावर प्रेम करणाऱ्या अशाच आहेत.. रामायणकालाच्या सुमारास रामराज्याच्या पश्चिमेस कौरवांची वसाहत होती त्यांच्या इतिहासांत स्त्रियांसंबंधानें पुढील मतें प्रदर्शित केलेली आढळतात.. त्यांवरून तत्कालीन स्त्रीसमाजाची योग्यता समजून येणार आहे-

(१) पूज्या लालयितव्याश्च स्त्रियो नित्यं जनाधिप ।
स्त्रियो यत्र च पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ॥ अनु० ४६ ५॥
( २ ) अपूजिताश्च यत्रैता सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।
तदा चैतत्कुलं नास्ति यदा शोचन्ति जामयः ॥ अनु०४६-६ ॥
(३) अर्ध भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा ।
भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः॥ आदि०७४-४०।।

 अर्थ – ( १ ज्या ठिकाणी स्त्रियांस मान मिळतो तेथें देवता आनंद पावतात ह्मणून स्त्रियांचें लालनपालन करून त्यांचा मान राखावा. ( २ ) ज्या ठिकाण स्त्रियांना मान मिळत नाहीं तेथें सर्व क्रिया निष्फळ होतात. ज्या कुळांत त्या दुःखीत असतात तें विनाश पावतें. ( ३ ) भार्या ही पतीची अर्धांगी आहे. ती त्याचा अत्यंत श्रेष्ठ मित्र आहे. ती धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषा र्थांचें मूळ असून भवसागरांतून तिच्यामुळे तरून जातां येतें-' भारत-