पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३७)

ते सदा मग्न व तत्पर असत. संसारसुखांत डोलणाऱ्या व केवळ प्रापंचिक कार्यात गुंतल्यामुळे मोह पडून स्वकर्तव्यापासून ढळणाऱ्या लोकांना पुनःपुनः सदाचरणाचा मार्ग दाखवून देण्यास ते कधींही चुकत नसत. त्यांच्या तेजापुढें राव व रंक सारखेच वांकत. असे हे ऋषिपदास पोहोंचलेले ब्राह्मण शहर- वासियांच्या कामधंद्याच्या गडबडीमुळे आपल्या अध्ययनादिक नित्यनैमित्तिक कर्मास त्रास होऊं नये म्हणून शहरापासून किंचित् लांब रहात. त्या कालच्या ब्राह्मणश्रेष्ठांची जी अनेक नांवें अमर झाली, त्यांत वसिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज, वाल्मीकि, ऋष्यशृंग, अत्रि वगैरे वैदिकांची चरित्रे रामायणांत आढळतात. वसिष्ठांचा आश्रम अयोध्यानगरीच्या बाहेर होता. वाल्मीकि तमसा व गंगा यांच्या संगमावर रहात. गौतम हे जनकराजाचे उपाध्याय असून मिथिले- जवळच्या एका आनंददायक काननांत रहात होते. विश्वामित्राचा आश्रम गंगेच्या पलीकडे असून तो सिद्धाश्रम या नांवानें प्रसिद्ध होता. भारद्वाज प्रयागास रहात होते. अत्री, सुचक्षु, अगस्त्य व इतर अनेक ऋषि दंडक नांवाच्या भयंकर अरण्यांत पर्णकुटिकेंत रहात. त्यांच्या हाताखालीं अनेक विद्यार्थी अध्ययनासाठी राहून गुरूची सेवासुश्रूषा करण्यांत आनंद मानीत. अशा प्रकारच्या आल्हाद देणाऱ्या जागेत अत्यंत उदात्त विचारांनी प्रेरित झालेल्या गुरूच्या उपदेशामृताचा आस्वाद घेऊन पुष्ट झालेले बाह्मण, क्षत्रिय व वैश्य विद्यार्थी कालेकरून समाजाचे नेते बनल्यावर त्यांच्या वर्तनाचा पगडा समाजावर बसे व त्यांच्याच सल्लयानें वागण्यास श्रीमंत व गरीब तयार असत. अशा सन्मार्ग- दर्शक समाजनायकांपैकीं जे कित्येक प्राचीन कालीं प्रसिद्धीस आले, त्यांतील श्रीराम व श्रीकृष्ण हे तर प्रत्यक्ष अवतार असे मानण्यांत आलें. निरिच्छपणे ब्रह्मकमें चालविणाऱ्या बाह्मणांचें रक्षण करणें, त्यांच्या लहानमोठ्या गरजा भागविणें व प्रसंगविशेषी त्यांचा गौरव करणें, यांतच युद्धकुशल क्षत्रियराजे व धनधान्यादिकांची समृद्धि सेवन करणारे वैश्य यांना आनंद व अभिमान वाटे. म्हणूनच ते ऋषिजनांचा सेवा करण्यास एका पायावर तयार असत. विशेषतः

रामायणकालीं ब्राह्मणांचें वर्चस्व

फार वाढलें होतें. राज्यवैभवसंपन्न असे क्षत्रिय देखील त्यांस मान देत. यामुळे सहजच सर्व प्रजाजनही त्यांस अत्यंत पूज्य मानीत असत. दशरथ व त्याचे सर्व पुत्र वसिष्ठाच्या अर्ध्यावचनात वागत. जनक हा त्या कालचा