पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३६)

करण्याबद्दल त्यानें रामास विनंति करतांच तो म्हणाला, 'लक्ष्मणा, माझे पिताजी केवळ सत्यस्वरूप आहेत, त्यांचा शब्द सत्य आहे, त्यांची कृत्येंही सत्यास धरून आहेत. परलोकाची त्यांना भीति वाटते. तरी ते त्यासंबंधानें निर्भय असोत. संपत्ति गेली म्हणून दुःखी होऊं नकोस. साम्राज्य व अरण्य हीं दोन्ही मला सारखींच आहेत. अरण्यांतही सुखानें राहूं.'

 दशरथाच्या मृत्यूनंतर वृद्ध मंत्री जाबाली ऋषीनें रामास अयोध्येस येऊन राज्यसूत्र हातीं घेण्याबद्दल आग्रह केला. तेव्हां रामानें जें उत्तर दिले त्यावरून त्याच्या अंतःकरणांत आग्ण पित्यास दिलेले वचन पूर्ण करण्यासंबंधाची इच्छा किती जाज्वल्य होती हैं दिसून येतें. जाबाली म्हणाला, 'रामा, बाप कोण आणि पुत्र कोण ? बापाची प्रतिज्ञा पुत्राला काय ह्मणून लागू असावी ? पिता, पुत्र, भाऊबंद इत्यादि सर्व थोतांड आहे. जें आपणा उपभोग घेण्यास मिळत आहे त्याचा स्व'कार करावा.' हे भाषण ऐकतांच क्रोधानें रामचंद्र म्हणाला - 'जाबाले ! सत्य हें मला सर्वांहून अधिक प्रिय आहे. राज्याची इमारतच सत्याच्या पायावर रचलेली आहे. सत्य सर्व धर्माचें मूळ आहे. लोभ, क्रोध किंवा मोह यांस बळी पडून मी सत्य कधींही सोडणार नाहीं. सत्य व कर्तव्यकर्म यांस धरून वागणे, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणीं दया दाखविणें, द्विज, देव व अतिथि यांची पूजा करणे हाच सन्मार्ग आहे, अस मुनिजन सांगत आले आहेत. त्याच मार्गानें आपण गेले पाहिजे." दुसऱ्या एका प्रसंगी त्यानें लक्ष्मणास सांगितलें, 'लक्ष्मणा, मी तुला खरोखर सांगतों की संपत्ति, सौख्य, राज्यपद यांचा स्वीकार मी तुझ्यासाठी करीत आहे. आम्हां बंधूंत ऐक्य असावें व सर्वांचें कल्याण व्हावें म्हणून मी राज्यपदाचा अंगिकार करितों, हें तुला सत्यास स्मरून सांगतों. सर्व जगावर राज्य मिळविणें मला अमाध्य नाहीं, परंतु अधर्माने मला इंद्रपदाचीही प्राप्ति झालेली नको. ' याप्रमाणे रामायणकाली आबालवृद्धाची

सामाजिक नीतिमत्ता

अत्यंत उच्च पायनीस पोहोंचण्याचे कारण काय असावें, याचा विचार करतां असे दिसतें कीं, समाजांत कालेकरून ज्यांस अग्रस्थान प्राप्त झालें होतें, असे ब्राह्मा आपल्या आचरणानें अत्यंत शुद्ध व उदात्त असत. त्याचा निस्पृहपणा श्रेष्ठ प्रकारचा अमे. अध्ययन व अध्यपन किंवा स्वतः शिकणें व दुसऱ्यास शिकविणें हेंच मानवजन्मांतील मुख्य ध्येय असे समजून तें साध्य करण्यांत