पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३५)

दांत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. जेव्हां प्रवाहण जैवालीजवळ गौतममुनि आला, तेव्हां त्यास प्रवाहण म्हणाला-

न प्राकू त्वत्तः पुरा विद्या ब्राह्मणान्गच्छति
तस्मादु सर्वेषु लोकेषु क्षत्रस्यैव प्रशासनमभूत्

 'गौतमा, ब्रह्मविद्येचा संस्कार तुझ्यापूर्वी इतर ब्राह्मणांस झालेला नाहीं, अर्थात् ती त्यांना अवगत नाहीं. केवळ क्षत्रियांसच ती अवगत आहे; कारण ती त्यांच्यामुळेच अस्तित्वांत आली.' अशा प्रकारचे उतारे किती तरी देतां येतील. यावरून स्पष्ट होतें कीं, क्षत्रिय हे ज्याप्रमाणें युद्धकलेत निष्णात होते तसेच ब्रह्मविद्येतही पारंगत असल्याकारणानें त्यांच्यामुळेच हें ज्ञान वृद्धिंगत झालें. धर्म व त्यास आधारभूत असें ब्रह्मज्ञान सांगणारे, परमेश्वरशक्ति व स्वरूप यांची ओळख करून देणारे व त्याच्यासंबंधाचा विचार समाजांत रूढ करणारे क्षत्रिय होते व रामायणकालचा जनकराजा हा या बाबतीत त्या सर्वाचा मुकुटमणि होता है निर्विवाद आहे. अवतारांची मीमांसा करितां परशुराम व वामन हे ब्राह्मणा- वतार मागे पडले व राम, कृष्ण हे क्षत्रिय अवतार पुढे आले, यांतील गोम तरी हीच आहे कीं, त्यांच्या हृदयांत खऱ्या ब्रह्मज्ञानाचा ठसा पूर्णपर्णे उमटला होता. योगवासिष्ठांतील रामाचे विचार व गीतेंतील कृष्णाचें तत्त्वज्ञान विषयक विवेचन यांवरून आमच्या विधानाची सत्यता दिसून येईल.

 रामचंद्र हा पितृवचनपरिपालनासाठीं अरण्यांत जाण्यास मोठ्या आनंदानें तयार झाला. त्याच्या सावत्र आईनें जेव्हां युवराजराज्याभिषेकाच्या ऐन वेळीं रामास राज्य देऊं नये, इतकेच नव्हे तर त्याला १४ वर्षे वनवासास पाठवावें असा हट्ट धरला, तेव्हां वृद्ध दशरथास अत्यंत दुःख झाले. परंतु पितृभक्त रामाच्या मनाला यत्किंचितही दुःखाचा स्पर्श झाला नाहीं. राम शांतपणें कैकयीस म्हणाला- 'माते, केवळ विषयाचा लोभ धरून या जगांत मला रहाणें नको आहे. प्रत्यक्ष प्राणत्याग करावा लागला, तरी तो करून मी माझ्या पिताजींची इच्छा पूर्ण करीन.' इतक्या कोमल वयांत असे विचार ज्या राजपुत्राच्या मनांत आले, त्याचें मन किती उदात्त व सुसंस्कृत झालें होतें, याची कल्पना सहज होण्याजोगी आहे. राज्याभिषेकाच्या आनंदोत्सवप्रसंगी उपस्थित झालेलें हैं विघ्न पाहून लक्ष्मणास वाईट वाटलें व देशत्याग करण्याबद्दलची पित्याची आज्ञा मान्य न