पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३१)

 रामाचें मन यामुळे अत्यंत अस्वस्थ झालें. एके दिवशीं एक योगी एकांतांत रामाजवळ बोलत असतां लक्ष्मणानें परवानगीवांचून दुर्वास ऋषी आंत जाऊं दिल्यामुळे योगी तत्काळ तेथून चालता झाला. लक्ष्मणाच्या या कृत्याबद्दल रामास वाईट वाटलें. या अपराधाबद्दल लक्ष्मणानें अयोध्या सोडून जावें अशी सल्ला वसिष्ठानें देतांच तो निघून गेला व सरयू नदीच्या तीर्थात त्यानें जलसमाध घेतली. रामानें आपलें राज्य लव व कुश यांस वांटून दिले. शत्रुघ्नानें आपल्या दोघां मुलांस राज्य देऊन तोही रामाबरोबर निघाला. सुग्रीवानें आपला पुतण्या अंगद यास किष्किंधेच्या गादीवर बसविलें. रामचंद्र, शत्रुघ्न, सुग्रीव व इतर कित्येकांनीं सरयू नदींत प्रवेश करून देहत्याग केला. याप्रमाणे रामचरित्र आहे.

शास्त्रोक्त विधि व चालू रूढि.

 चैत्र शु. ९ मीस माध्यान्हीं रामजन्मोत्सव करावा. त्या दिवशीं रामाच्या मूर्तीची पूजा करावी व उपोषण करावें. रात्रीची वेळ रामभजनांत घालवावी. दुसऱ्या दिवशीं मिष्टान्न भोजन करावें. होम, प्रतिमादान वगैरे विधि शास्त्रांत सांगितले आहेत, परंतु ते रूढ असल्याचें दिसत नाहीं. हा उत्सव रामाच्या व इतर विष्णूच्या देवालयांतून साजरा केला जातो. कित्येक लोक आपल्या घरीं देखील रामजन्मोत्सव करितात. बरेच लोक या दिवशीं उपोषण करतात. कित्येक रामजन्माचा उत्सव माध्यान्हीं पूर्ण होतांच मिष्टान्न भोजन करतात. राममंदि- रांत प्रतिपदेपासून नवमीपर्यंत रामायणाचें वाचन, कीर्तन, भजन वगैरे चालतात. नवमीच्या दिवशीं पालखीची मिरवणूक निघत असते. अयोध्या, नाशीक, तिरु- पति, रामेश्वर वगैरे ठिकाणी हा उत्सव अत्यंत प्रेक्षणीय असा होत असल्यामुळे दूरदूरचे हजारों यात्रेकरू त्या ठिकाणीं जमतात.

ऐतिहासिक माहिती.

 पंजाबांत प्रथमतः वसाहत केलेल्या आर्यांचा वेलविस्तार वाढतांच सुदास नांवाच्या अनार्य ( दस्यू वंशाच्या ) पुढान्याशीं युद्ध करण्यांत गुंतलेल्या भर ताचे वंशज पूर्वेकडील भागांत वसाहत करूं लागले. त्यांनी गंगा व यमुना या नद्यांच्यामधील प्रदेश आपल्या ताब्यांत घेतला व सांप्रतच्या दिल्लीजवळ हस्तिना- पूर हें राजधानीचें शहर वसविलें; आणि चोहोंकडे आपली सत्ता स्थापन केली. हे कुरुवंशाचे असल्यामुळे त्यांना कौरव असें नांव प्राप्त झाले. त्यांच्या प्रमाणे आर्यांची दुसरी एक लाट गंगा नदीच्या पलीकडे हिंदुस्थानच्या पूर्वभागा-
.