पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३२)

वर पसरली. त्यांनी नवीन राज्य स्थापन करून अयोध्या, काशी व बिहार यांच्या आसमंतात् वसाहती केल्या. या आर्यवसाहतवाल्यांत विदेही, कोसल व काशी असे तीन वंशाचे लोक होते. त्यांपैकीं अयोध्या ही कोसलांची, उत्तर बिहारांत मिथिला ही विदेही यांची राजधानी होती. विदेही वंशांत जनक हा राजा अत्यंत प्रसिद्ध होऊन गेला. कोसल कुलांत रामचंद्राची कीर्ति अजरामर झाली. रामाच्या कालीं कोसल व विदेही यांच्यांत विवाहसंबंध घडून आला. · जनकाची कन्या सीता हीच रामायणांतील चरित्रनायिका आहे. रामायणकालीं आर्यांनीं जो प्रांत काबीज केला तो सुपीक असून स्वनंदी या नांवानें प्रसिद्धीस आलेली गंगानदी या प्रांतांतून वहात असल्याकारणानें, तिच्या कांठीं अनेक तपो- वर्ने उभारून विद्वान् ऋषि : ब्रह्मज्ञानाचा विचार करण्यांत गर्क झालेले असत. या प्रदेशांतील लोकांची सांपत्तिक स्थिति उत्तम असून ते तेजःपुंज व बलवान् होते, असे रामायणावरून दिसतें. वाल्मीकीनें जेव्हां नारदास आपण कोणत्या वीरासंबंधानें काव्य लिहूं असा प्रश्न केला, तेव्हां त्यानें त्यास इक्ष्वाकुकुलांत अत्यंत श्रेष्ठ अशा रामाचें चरित्र लिहिण्यास सांगितलें; तेव्हां रामाच्या स्वरू- पाचें जें वर्णन केले आहे, त्यांत त्याचें शरीर पूर्णावस्थेस पोहोंचलेलें होतें असें दर्शविलें आहे. स्त्रियांचीही प्रकृति उत्तम प्रकारची होती. कैकयीनें पतीस युद्धाच्या वेळी मदत केली. राक्षसनगरींत एकटी असतांना देखील सीता राव- णाच्या दुष्टपणाच्या धमकावणीला घाबरली नाहीं, यावरून स्त्रियांच्या अंगीं धीरो- दात्तता पूर्णपणें वसत होती व संकटास त्या जुमानीत नसत असे दिसतें. शारी- रिक बलाच्या अभावीं साहसाची कामें घडणें शक्य नाहीं. राजकुलांतच शारी- रिक संपत्ति दृग्गोचर होत असे असें नाहीं. जेव्हां रामचंद्र वनवासास निघाला, तेव्हां त्याच्या मागें चाललेला व त्याला नगराच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यास आलेला सुदृढ अशा लोकांचा समुदाय पाहून रामास आनंद झाला, असे वाल्मीकी नें लिहिले आहे. तसेंच रामचंद्राच्या रथाला गाईच्या कळपांमुळे वारंवार अडथळा होऊं लागला असें जें वर्णन आहे, त्यावरून त्या कालीं दूधदुभतें विपुल देण्या- इतक्या गाई नगरीत होत्या व गोधन व धान्यादि संपत्तीनें युक्त असे लोक सौख्यानें दिवस घालवीत असत, असे दिसतें.

क्षत्रियांचा मुख्य धर्म

 दुष्ट व घातकी शत्रूंचा नाश करणें हा असल्यामुळे, ते अगदर्दी लहान वयां- तच वेदविद्येयरोबर समरविद्याही शिकत असत. नुसत्या शब्दध्वनीवर शर-