पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७) आतां तरी पुढे हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥ सकळांच्या पाया माझें दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥ हित तें करावें देवाचें चिंतन | करूनियां मन शुद्ध भावें ॥ तुका ह्मणे हित होय तो व्यापार | करा काय फार शिकवावें ॥ प्रभातकालचें ईशस्मरण. भूप राग. विश्वरंगणी श्रेष्ठ असा नरजन्म मला लाभला । तुझ्या कृपेनें, आनंदघना आलो शरण तुला ॥ धृ० ॥ प्रभात झाला दिशा दीप्त बहु रविकिरणे दिसती । खगगण मोदें वृक्षस्कंध स्तोत्रें तव गाती । मंद पवन सुमगंधयुक्त हा देइ सौख्यशांति । अज्ञाननिशा लोपलि पसरे ज्ञानसूर्यकांति ॥ १ ॥ नरजन्मीं मत्करी घडों दे प्रिय तुज ती कार्ये । विद्या बुद्धी नीति विशारद म्यां व्हावें आयेँ । परोपकारी आत्मोद्वारीं सतत काल जावा । आज्ञा होतां आनंदाने येइन तव गांवा ॥ २ ॥ तीर्थाटनजपतपसाधन जरि नच घडले कांहीं ॥ शास्त्रपुराणे वेदांचेंही ज्ञान मुळीं नाहीं ॥ जगतामाजी अद्भुत शक्ति पाहुनि तव ठायीं ॥ प्रेम भक्ति जडली प्रभुराया तूंचि तात आई ॥ ३ ॥ मोह निरसला भंग पावले सर्व पाश आतां । नाहीं मजला तुझ्या प्रसादें तिळभरिही चिंता । मिळतां तुजसम दाता त्राता काय कमी ताता। उद्धरुनी मी जाइन तैसा उद्घारिन जनता ॥ ४ ॥ हेंचि मागणे कर जोडुनियां दावि मार्ग मजला । पार्थरथीं त्या कृष्णसारथी जैविं समरिं झाला ॥ तैसा तूं हो नेता त्राता संकट-समयाला । तनु मन धन तुज अर्पण केलें पाव सख्या मजला ॥५॥