पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२६)

पडणारी कामें नीट रीतीनें पार पाडण्याची पात्रता अंगीं येण्यास स्वतः चित्रगुप्त होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. साधारणपणे जगांतील बरें वाईट समजूं लागतांच लहानशी रोजनिशी आपल्या जिवार्शी बाळगून तींत आपण केलेल्या बच्या वाईट कामांची, अनुभवाची, विचारांची व आकांक्षांची प्रत्यहीं नोंद करण्याची संवय लावून घ्यावी. असे केल्यानें आपणावर स्वतःचीच देखरेख राहून योग्य प्रसंग येतांच आपल्या अंगीं महत्कार्य करण्याची पात्रता येईल. आपल्या अंतःकरणांत सत्कर्माबद्दल उमेद व दुष्कर्माबद्दल पश्चात्ताप व 'तिटकारा उद्भवल्याशिवाय आपले पाऊल कधींही पुढे पडणार नाहीं. आम्ही - मनुष्य आहों, त्यांतूनही आर्य ऋषींनी स्थापन केलेल्या सनातन हिंदुधर्माचे अनुयायी आहों त्या अर्थी आपलें वर्तन मनुष्यपणास व आर्यत्वास साजेल असेच असले पाहिजे. प्रत्येक दिवशीं सूर्यास्त होतो, तसतसे आपले आयुष्य · क्षीण होत आहे हें ध्यानीं असावें. त्यासाठी आपण क्षणभंगुर व नियमितपणें -नाश पावणाऱ्या या आयुष्याचा दुरुपयोग न करता त्याचा शक्य तेवढा उपयोग करण्यास शिकावें. नूतन वर्षाच्या उदयाबरोबर अंतःकरणांत नवीन आशांकुर उत्पन्न होऊन नवीन वर्ष आनंदांत जावो, अशी सदिच्छा उत्पन्न होत असते. आंग्लसत्ता स्थापन झाल्यापासून इंग्रजी शिक्षणाचा अंमल ज्यांच्या वर बसला आहे असे लोक जानेवारीच्या पहिल्या तारखेस वर्षांरंभ मानून पत्रद्वारें ( New year's card ) आपल्या आप्तमित्रांच्या मेटी घेत असतात. या पद्धतीचें अनुकरण करून चैत्र शुद्ध १ स अर्शी हिंदुपद्धतीचीं पत्रे पाठविण्याची रूढि पाडण्याचा कांहीं चित्रकारांचा यत्न साधत आहे. परंतु या औपचारिक - सदिच्छादर्शक पत्रांपेक्षां प्रत्येक संवत्सरी आपल्या अनाथ बांधवांस आपलें • तनुमनधन शक्त्यनुसार अर्पण करण्याचा आपण निश्चय करूं तर विशेष चांगलें होईल. आयुष्याची दोरी केव्हां तुटेल हे सांगतां येत नाही म्हणून परमेश्वराचें •बोलावणें येतांच हा मृत्युलोकांतील कारभार एकदम बंद करून शांत मनानें 'निजधामास जाण्याकरितां निघण्याची आपली तयारी असली पाहिजे. गेलेली संपत्ती उद्योगानें प्राप्त करून घेतां येईल; नष्ट झालेले आरोग्यही पुनः औषधो- •पचारानें मिळवितां येईल; लुप्त झालेलें ज्ञान अभ्यासाच्या योगानें संपादितां येईल; परंतु व्यर्थ गेलेला काल गेला तो गेलाच. यासाठी प्रत्येक निमिषाचा सदुपयोग करून प्रत्येक संवत्सराच्या आरंभींच्या दिवशीं स्वतःचें अभिनंदन करून घेण्याची प्रत्येकानें तयारी ठेविली पाहिजे. शेवटीं साधु तुकारामाच्या शब्दांत सांगावयाचें म्हणजे,