पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३ )

समाजाच्या माथ मारून तो कर्तृत्वशून्य करून टाकण्यांत आला आहे असे सुशिक्षितांचें मत बनत चालल्यामुळे हिंदुधर्मास उतरती कळा लागून तो नामशेष होईल की काय अशी भीति कित्येक पुराणमतवादी लोक अंतःकरण- पूर्वक प्रगट करतात. परंतु त्यांस इतकेंच सांगणे आहे कीं, वेद व उपनिषदें यांच्यावर अधिष्ठित असा हिंदुधर्म कदापि नामशेष होणार नाहीं. त्याचें स्वरूप मात्र विशेष उज्ज्वल होऊन तो सनातन, सार्वलौकिक व शाश्वत असा धर्म बनेल – तसा तो बनविण्यास सर्व मतांच्या लोकांनीं मात्र झटण्याची तयारी केली पाहिजे. आणि प्रत्येक सणाशीं धर्माची सांगड घालून त्याचें महत्त्व राखण्याचा जुन्या शास्त्रकारांनीं जो यत्न केला आहे त्याचें महत्त्व जाण- ण्यांतच आपलें खरें कल्याण आहे हें विसरतां नये.

 कालाचे निरनिराळे भाग किंवा युगे यांचा विचार करतां, प्रत्येक युगांत विवक्षित कार्य करण्यासाठी सत्पुरुष उत्पन्न झाल्याचे दिसून येतें. (यासंबंधाचें विवेचन नृसिंहजयंती, रामनवमी, महाएकादशी या सदराखालीं पहावें.) द्वापर- युगांत कृष्ण, युधिष्ठिर, भीष्म वगैरे सत्पुरुषांनीं अन्यायाचा दुष्परिणाम काय आहे हे दाखविलें. त्रेतायुगांत राम, वैदेही जनक वगैरे आयांनीं प्रपंचाचें रहस्य काय आहे, प्रपंचांत असून परमार्थ कसा साधावा, निष्काम कर्म व स्वार्थत्याग यांची मातबरी किती हैं आपल्या उदाहरणांनीं सिद्ध केलें. कृतयुगांत अनेक ऋषींनीं मनुष्याचें ध्येय काय असावें याचा उलगडा केला. सनत्कुमार, नारद, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विश्वामित्र, अजातशत्रु, अनसूया, गार्गीवाचक्नवी वगैरे विचारवंत ज्ञानी सत्पुरुषांनीं व आर्यमहिलांनी हिंदुधर्मरूपी प्रासादाचे शिल्पकार बनून त्याला अत्यंत रमणीय स्वरूप प्राप्त करून दिलें. कलियुगांत बुद्ध, शंकरा- चार्य वगैरे महनीय विभूतींनीं प्रेम व विश्वबंधुत्वाची ध्वजा या प्रासादशिखरीं रोविली. अशा परमपूज्य आयांचे प्रयत्न कधींही निष्फळ होणार नाहींत. त्यांचा आशीर्वाद जसा हिंदुधर्मास आजवर अनेक संकटांतून सोडविण्यास समर्थ झाला • तसाच तो पुढेही या धर्मानुयायांचा पाठिराखा होऊन राहील.

धार्मिक समजत.

 ज्या कारणांवरून चैत्र शु. प्रतिपदा हा संवत्सराचा आरंभींचा दिवस ठरला, तीं कारणे मागें दिली आहेत. परंतु यासंबंधाची धार्मिक समजूत कांहीं निराळीच आहे. श्रीरामचंद्र चवदा वर्षे वनवास करून सीतेसह आपल्या नगरींत परत