पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२)

रात्र आहे अर्शी वाक्यें वेदांत सांपडतात. यावरून मृगशीर्ष नक्षत्री चंद्र अस तांना दुसऱ्या दिवशीं वर्ष सुरू करण्याची पद्धति होती असे दिसतें. पंचविंशत् ब्राह्मणांत फाल्गुन महिन्यास 'मुखं वा एतत्संवत्सरस्य यत्फाल्गुनः' म्हणजे फाल्गुन हेंच संवत्सराचें मुख होय असे म्हटले आहे. यावरून वर्षारंभ माघ व. १ किंवा फाल्गुन शु. १ हा असला पाहिजे. हल्लीं फाल्गुनाच्या किंचित् पुढे चैत्रारंभीं वर्षांरंभ मानतात. याशिवाय इतर महिन्यांतही निरनिराळ्या प्रांत सौर मानाप्रमाणे सूर्याच्या राशीसंक्रमणारून वर्षारंभ मानतात. तथापि सर्वांत चैत्रास अधिक मान देण्यांत आला असून तोच प्रारंभींचा मास आहे असे सामान्यतः हिंदु- समाज मानीत असतो. प्रत्येक हिंदु म्हणविणारा कोणतेंही शुभाशुभ कृत्य करितेवेळीं

संकल्पाचा उच्चार

करीत असतो. त्याचा अर्थ लक्षांत घेतां असे दिसून येईल कीं, आपण ब्रह्मांडो- तील एक व्यक्ति या नात्यानें आपणाबद्दलचा विचारच तो करीत असून आपले धार्मिक कृत्य करण्यास प्रवृत्त होत असतो. हल्लीं या संकल्पांत ऐहिक सुख प्राप्त होवो वगैरे अर्थाच्या शब्दांचा जो समावेश करण्यांत आला आहे तो · मात्र अलीकडच्या वैदिक वर्गाच्या कल्पनांप्रमाणे आहे. जीं धार्मिक कृत्यें करण्यांत येतात त्यांची उभारणी धर्माच्या पायावर झाली असून धर्म म्हणजे देवत्वास किंवा ब्रह्मत्वास परत जाऊन मिळण्याचा एक मार्ग आहे असे हिंदु समजतात व सर्व कृत्यें त्या ब्रह्मास अर्पण करण्यांत येतात. धर्म म्हणजे एखाद्या व्यक्तीचा उपदेश नसून तो अनादि व शाश्वत आहे अशी प्रत्येक हिंदूची समजूत आहे. सत्य व निष्काम-कर्म हींच धर्माचीं मुख्य अंगें अस ल्याचें निरनिराळ्या प्रसंगीं विचारी आर्यानीं सांगितले असून तो शक्य तेवढा उज्ज्वल राखण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतःच केला असल्याचें दिसून येतें. सत्या- परता धर्म नाहीं-सत्यामुळेंच विश्व टिकलें आहे असे उद्गार त्यांनीं वेळोवेळां काढले आहेत. स्थरकाष्ठपाषाणादि एकंदर दृश्य अदृश्य पदार्थात परमेश्वराचा अंश आहे अशी ज्यांच्या मनाची पूर्णपणें भावनाच झाली आहे त्यांनी प्रत्येक व्यवहारांत धर्मास अग्रस्थान दिले यांत आश्चर्य नाहीं. प्राचीनकाळीं निरनिराळ्या स्वतंत्र विचाराच्या ऋषींनीं विचारपूर्वक धर्मास अग्रमान दिला. सर्वांनीं सत्याचा विजय झालेला पहावा म्हणून निरनिराळ्या अवतारांची योजना करण्यांत आली. धर्म या नांवाखाली अनेक अनावश्यक कर्माचें अवडंबर