पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
(२१)

व कानडी प्रांतांतील लोक चांद्रमानाप्रमाणे महिना व सौरमानाप्रमाणें वर्ष पाळतात. मल्याळी लोक तामिळ लोकांप्रमाणेंच वर्ष गणतात. प्राचीन काळीं मकरसंक्रांत हाच वर्षारंभ होता असें सध्यां अवशिष्ट राहिलेल्या धर्मविधींवरून दिसते. परंतु हा दिवस शिशिर ऋतूच्या प्रारंभींचा असल्याकारणानें वसंत काल हाच योग्य मानून त्या महिन्यावर वर्षारंभाचा दिवस ढकलला असावा. सुमारें] ८०० वर्षांमागें काश्मीर प्रांतीं चैत्र हाच महिना प्रथममास मानीत असें आल्बेरूनीच्या लेखांवरून दिसतें. चैत्रशुद्ध १ हा दिवस तेथील लोक मोठ्या उत्साहाने पाळीत व हा परशत्रूस राजानें मागें हटविल्याचा दिवस आहे अर्से ते समजत. या सणास अगदुस ( ? ) असे नांव असल्याचेंही आल्बेरूनीनें लिहिले आहे. कानडी प्रांतांत वषारंभाच्या दिवसास 'इगादि' असें ह्मणतात. अगदुस, इ दि व युगादि ह्या शब्दांचा एकमेकांशीं कांहीं संबंध आहे किंवा कसे याचा इतिहास संशोधकांनीं विचार करण्याजोगा आहे. श्रुति, स्मृति, पुराण, वेदांगें व ज्योतिष ग्रंथ आणि धर्मशास्त्र यांचा विचार केला असतां आणि वसंतऋतूचा प्रारंभही चैत्रांत होतो ही गोष्ट लक्षांत घेतली तर चैत्र हाच प्रथमचा महिना ठरतो. व चैत्र शु. प्रतिपदा हाच वर्षारंभाचा योग्य दिवस होय. गुप्तराजांची सत्ता एकाकालीं उत्तर हिंदुस्थानांत सर्वत्र पसरली होती, तेव्हां चैत्रारंभी वर्षारंभ होत असे, असें प्राचीन लेखांवरून दिसतें. चैत्राच्या खालो- खाल ज्या महिन्यास अग्रमान मिळाला तो कार्तिकमास असून

कार्तिक शु० १ स वर्षारंभ

मानण्याचा संप्रदाय उत्तर हिंदुस्थानांतील कांहीं भागांत आहे. विशेषतः विक्रमसंवत् मानणारे कार्तिक शु. १ स वर्षारंभ मानतात. महाभारतांत मार्गशीर्ष हाच पहिला महिना असे सांगितले आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शु. प्रतिपदेस मोठी दिवाळी मानण्याचा महाराष्ट्रांत प्रघात आहे. प्राचीन कालीं या दिवसाला वर्षारंभाचा दिवस मानण्याच्या पद्धतीवरून ही रूढि अविशिष्ट राहिली असावी. आल्बेरूनीच्या वेळेपर्यंतदेखील मार्ग- शीर्ष हा प्रथमचा मास असे समजत असत असे दिसतें. मृग नक्षत्रास अग्रहायणी असें नांव आहे. 'अग्र' म्हणजे टोंक व 'हायन' म्हणजे वर्ष अर्थात् ज्या नक्ष- त्राच्या रात्रीच्या अग्रभागीं वर्ष आहे तें नक्षत्र अग्रहायणी ( किंवा मृगशीर्ष ) होय. पूर्व फल्गुनी ही संवत्सराची शेवटची रात्र व उत्तर फल्गुनी ही पहिली