पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २० )

तीर्थ दिलें व तें मृतांवर शिंपडतांच तीं जीवंत झालीं. म्हणून त्या षष्ठीस अशोक षष्ठी म्हणतात. चैत्र शु. ८ मीस अवतारी परशुरामानें पापक्षालनार्थ ब्रह्मपुत्रा नदीत स्नान केले अशी कथा आहे. डाक्याजवळ ब्रह्मपुत्रानदी सीत- लाक्षा या नदीस मिळते. या तिथीस या नदींत स्नान केल्यानें पापक्षालन होतें अशी समजूत असल्यामुळे या दिवशीं उत्तर किनाऱ्यावर मोठी स्नानयात्रा भरते. चैत्र शु. ९ मीस रामनवमीचा उत्सव या देशांत सर्वत्र चालतो. या त्रयो दशीस मदन त्रयोदशी असें नांव असून उत्तर हिंदुस्थानांत या दिवशीं स्त्रिया : रतिमदनाची पूजा करतात. गीत, वाद्य, नृत्य वगैरे मनोरंजक प्रकार दृष्टीस पडतो. चैत्र पौर्णिमेस हनुमज्जयंतीचा उत्सव सर्वत्र रामाच्या व मारुतीच्या देवालयांतून होत असतो. चैत्र कृ. १३ स शततारका नक्षत्रांत चंद्र आल्या- वेळीं गंगास्नान करणें विशेष पुण्यकारक आहे असे मानिले असून या दिवशीं गंगा व इतर पवित्र नद्यांच्या ठिकाणी स्नानयात्रा भरते. या उत्सवास वारुणी असें नांव आहे. चैत्र महिन्यांत बंगाल्यांत प्रत्येक गुरुवारीं व महाराष्ट्रांत शुक्र- चारी स्त्रिया लक्ष्मीची पूजा करतात.


संवत्सरप्रतिपदा.
सर्वेऽत्र सुखिनः सन्तु

या जगांत सर्व लोकांस सांख्य प्राप्त होवो ! सर्व लोक आरोग्याचा उपभोग घेवोत ! सर्वांच्या दृष्टीला कल्याणप्रद प्रसंग पडोत ! कोणावरही दुःखाचे प्रसंग न येवोत !
प्रत्येक धर्मातील लोक वर्षारंभाचा दिवस फार महत्वाचा आहे असे मानतात. मूलतः ज्योतिषशास्त्रावरून वर्षांचा प्रथमचा दिवस ठरलेला असतो; तथापि त्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदुलोक हा दिवस पुण्यकाल आहे असें समजतात. सर्व हिंदुलोक चैत्रारंभ हाच वर्षांरंभ असे मानीत नाहींत. कित्येक चंद्राच्या तर कित्येक सूर्याच्या गतीवरून वर्षारंभ ठरवितात. कांहीं जण चांद्रमास व सौरवर्ष पाळतात. * तामिळ प्रदेशांत सौरमान वर्ष चालू आहे. तेलगू


  • यासंबंधाची सविस्तर माहिती या पुस्तकाच्या आरंभी 'विषयप्रवेश' या

सदराखालीं पहावी.