पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) ऐतिहासिक साधनांवरून असे सिद्ध होत आहे कीं, ख्रिस्तीशकाच्या पहिल्या शतकांत शकराजा कनिष्क याच्या नांवानें हा शक सुरू करण्यांत आला. अर्थात् बौद्धधर्मीय राजाच्या नांवाचा हा काल आहे. या राजानें काश्मीर व पश्चिम हिंदुस्थान काबीज करून आपली सत्ता स्थापन केल्यावर हा शक प्रचारांत आला. तिबेट, ब्रह्मदेश, जावा, सिंहलद्वीप वगैरे ठिकाणीं हा शक चालू होता. त्या देशांतील प्राचीन लेखांत विक्रमादित्यशकाचा उल्लेख नाहीं. सुमारें ५००।६०० वर्षांनंतर शालिवाहन शक हिंदूंनीं चालू केला. परंतु बुद्धराजाचा शक असे न मानतां शकांचा पाडाव हिंदुराजानें केला, या समजुतीवरून त्यांनीं तो शक स्वीकारला. प्राचीन लेखांत याला 'शकनृपकाल, 'शकेंद्रकाल' अर्से झटलें आहे. या शकास 'शकनरपतेः अतिताब्द 'असें बंगाल्याकडील पंचांगांत ह्मणतात. यावरून देखील हा शकराजाचा काल आहे, असें इतिहाससंशोधकांचें ठाम मत झाले आहे. १८ कांहीं अर्वाचीन कालविवेचकांच्या मतें शालिवाहन शक हा शालिवाहन राजानें सुरू केलेला नाहीं. सुमारें दहाव्या शतकापूर्वीच्या लेखांत या शकाचा उल्लेख नाहीं. त्याला शालिवाहनशक असे न ह्मणतां 'शक नृपकाल 'वगैरे नांवें दिली आहेत. त्यानंतरच्या लेखांत मात्र या शकाचा उल्लेख आहे; आणि असेंही सिद्ध होतें कीं, शकनृपकाल हाच शालिवाहन शक या नांवानें संबोधिला गेला. कित्येक असें प्रतिपादन करितात कीं, शालिवाहन किंवा सातवाहन ही व्यक्ति नव्हती. हें आंध्रभृत्य घराण्याचें नांव आहे. कांहींचें असे मत आहे कीं, शालिवाहन नांवाची व्यक्ति होती. त्याच्यासंबंधानें आंध्रभृत्यांचा समकालीन जो गुणाढ्य कवि यानें स्पष्ट उल्लेख केलेला आहे. या शालिवाहनानें आपल्या नांवें शक चालू केला किंवा नाहीं, या प्रश्नाचें मात्र अद्यापि स्पष्टपणें उत्तर मिळालेलें नाहीं. हिजरी सन. हा मूळचा अरबस्थानांतील शक होय. मुसलमानी धर्माचा स्थापक महंमद पैगंबर हा धर्म सुधारण्यासंबध प्रयत्न करीत असतां त्याला आपल्या जीवरक्षणासाठी मक्केहून मदिना येथें पळून जावें लागलें. तो काल हिजरी किंवा पलायनकाल या नांवानें प्रसिद्ध झाला. याचा प्रारंभ इ. स. ६२२ त जुलै महिन्यांत (शक ५४४ श्रावण शु. २ गुरुवार रात्री किंवा मुसलमानी शुक्रवारच्या रात्रीं ) १५ व्या तारखेस झाला. बारा चांद्रमास मिळून ३५४१३५५ दिवसांचें हिजरी वर्ष होतें. वाराचा आरंभ सूर्यास्त होतो. हा सन मुसलमानी अमदानींत हिंदुस्थानांत चालू झाला.