पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३ ) सप्तर्षिकाल. काश्मीर व आजूबाजूच्या प्रांतांत सप्तर्षिकाल गणण्याची रूढि प्रचारांत आहे. याला 'लौकिककाल' किंवा 'शास्त्रकाल' असेंही नांव आहे. ध्रुवनक्षत्राभोंवत सप्तर्षि १०० वर्षांत एक नक्षत्र आक्रमण करितात. याप्रमाणे २७०० वर्षांत त्यांची एक प्रदक्षिणा पूर्ण होते, या समजुतीवर या कालाची गणना आहे. प्रत्येक १०० वर्षे पूर्ण झाल्यावर पुनः पहिले वर्ष गणण्यांत येतें. पौर्णिमान्त चैत्र शु. १ दा हा सप्तर्षि- कालाचा वर्षारंभ आहे. बंगाल खेरीज करून सगळ्या उत्तर हिंदुस्थानांत विक्रमकाल किंवा विक्रम- संवत् चालू आहे. ख्रिस्तीशकाच्या ५६ वर्षांपूर्वी हा काल विक्रमकाल. गणण्यास प्रारंभ झाला असे जरी मानतात तरी त्यानंतर ६०० वर्षेपर्यंत या संवताचा उल्लेख जुन्या लेखांत सांपडत नाहीं. त्या सुमारास जो प्रसिद्ध विक्रमादित्य राजा उज्जयिनींत होऊन गेला त्याच्याच नांवावर हा शक चालू झाला. साधारणतः अशी समजूत आहे कीं, विक्रमादित्यानें परकीय लोकांची स्वारी परतविल्यामुळे हा काळ गणण्याची • रूढी पडली. यास ऐतिहासिक आधार नाहीं. ख्रिस्तीशकापूर्वी ५६ वर्षे अस्ति- त्वांत असलेल्या या कालाचा विक्रमादित्याच्या नांवाशी संबंध जोडण्यांत आला असे तज्ज्ञांचें म्हणणे आहे. गुप्तराजांच्या वेळचे लेख तपासून मि. फ्लीट यांनीं असें मत दिलें आहे कीं, मूलतः मालवकुलाच्या लोकांत हा संवत्काल रूढ होता. विक्रमादित्याच्या कारकीर्दीत मालव कुलाची उन्नति झाली, तेव्हां त्याच्या नांवानें हा जुना काळ चालू करण्यांत आला. शालिवाहन शक. शालिवाहन नांवाच्या एका कुंभाराच्या पुत्रानें मृत्तिकेचें सैन्य तयार करून त्याच्यांत जीव भरला व त्याच्या मदतीनें शक लोकांचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहननृपशक चालू झाला, अशी सामान्यतः धर्मसमजूत आहे. हाच शक ज्योतिषग्रंथांत घेतला आहे. हा शक मलवार व तिनेवल्ली हे प्रांत खेरीज करून इतरत्र दक्षिण हिंदुस्थानांत रूढ आहे. ह्याचें वर्ष चांद्र व सौर आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील कित्येक प्रांतांत स्थानिक कालांबरोबर शककालही गगतात. नर्मदेच्या उत्तरभागीं याचे महिने पौर्णिमांत आहेत, आणि दक्षिणभागअ मांत आहेत. याचा प्रारंभ ख्रिस्तीशकाच्या ७८ व्या वर्षी आहे,