पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५) बंगाली सन. बंगाल्यांत बंगाली सन रूढ असून त्याचा आरंभ मेष संक्रांतीस (चैत्र - वैशा- खांत ) होतो. मेष संक्रांतीला जो महिना सुरू होतो त्याला वैशाख म्हणतात. यालाच तामिळ प्रांतांत चैत्र म्हणतात. हा सन ख्रिस्तीशकानंतर ५९३ वर्षांनी सुरू झाला. ओढिया प्रांताचा राजा इंद्रद्युम्न याच्या जन्मतिथीपासून म्हणजे भाद्रपद शु.. १२ पासून अमली वर्ष सुरू होतें. वर्ष चांद्र व सौर आहे. विलायती सन बंगालच्या कांहीं भागांत मुख्यतः ओरिसा प्रांतांत चालतो. याचें वर्ष सौर व महिन्यांची नावें चांद्र आहेत. वर्षारंभ कन्या राशीच्या संक्रमणीं ( भाद्रपदांत ) होतो. हे दोन्ही सन ख्रिस्ती सनानंतर ५९२ वर्षांनी सुरू झाले. विलायती व अमली सन फसली सन. अकबरानें हा सन प्रचारांत आणला. अकबर इ. स. १५५६ सालीं राज्यावर बसला. त्या वेळेपासून हा सन अमलांत आला. पौर्णिमांत- मानाच्या आश्विन कृष्ण १ स फसली वर्षांचा आरंभ होतो. ख्रिस्तीशक व फसली सन यांच्यांत ५९२/५९३ वर्षांचें अंतर आहे. बंगाल्यांतील फसली, विलायती आणि अमली या सनांचा अंक- एकच असतो. हें वर्ष पिकाच्या हंगामाचें असतें. हा सन खिस्ती सनापेक्षां ५९९/६०० वर्षांनी कमी आहे. याचा आरंभ सूरसन किंवा सूर्य मृगनक्षत्रीं जातो तेव्हां होतो. वर्ष सौर आहे. महिने शाहूर सन मोहरम वगैरे चांद्र आहेत. मराठ्यांचे कारकीर्दीत सूरसन फार प्रचारांत होता. हा सन चितागांग प्रांतांत सुरू आहे. बंगाली सनाहून ४५ वर्षांनी कमी मगीसन. असून इतर सर्व गोष्टींत दोन्ही एकच आहेत. हा काल केरल देशांत म्हणजे मलवारांत सुरू आहे. मंगळूरपासून कुमारी भूशिरापर्यंत आणि तिन्नवेली प्रातांत कोल्लम काल गणतात. कोल्लम किंवा महिन्यांचीं नांवें मेष, वृषभ वगैरे राशींवरून पडलेलीं परशुराम काल आहेत. उदाहरणार्थ कन्नी, चिंगम वगैरे नांवें कन्या, सिंह यांचे अपभ्रंश आहेत. मलबारच्या उत्तरभागांत कन्या राशींत सूर्य येतांच ( भाद्रपदांत ) वर्षारंभ होतो; व इतरत्र सिंह राशींत सूर्य येतांच ( श्रावणांत ) वर्ष सुरू होते. १००० वर्षांनी एक चक्र याप्रमाणें चौथे चक्र सध्या चालू आहे असे तेथील लोक समजतात. परंतु हजारावरच न थांवतां