पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १० )

म्हणतां येईल कीं, चंद्रसूर्यामध्यें १२-१२ अंशांचें अंतर पडण्यास जो काळ लागतो ती तिथि होय. ६३.९ (अजमा ६४ ) दिवसांत १ तिथीचा याप्रमाणे १२ चांद्रमासांत ५-६ तिथींचा लोप होतो. सूर्योदयीं जी तिथी असेल तीच गणतात. दोन दिवस सूर्योदय तिथी असल्यास तिथिवृद्धि व सूर्योदयीं एखादी तिथि नसल्यास तिथिक्षय असे म्हणतात. तिथीच्या अर्ध्यानें अंतर पडण्यास लागणारा काल ह्यालाच करण म्हणतात. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशींच्या सूर्योदया- पर्यंतचा काल त्याला चार म्हणतात. एकेक भाग ८०० कलांचा असे नक्षत्र- मंडळाचे २७ भाग करून त्या प्रत्येक भागास आणि तो कमण्यास चंद्रास जो काळ लागतो, त्यास नक्षत्र म्हणतात. चंद्रसूर्यांच्या भोगांची बेरीज (योग) करून तिजवरून ८०० कला बेरीज होण्यास जो काळ लागतो त्यास योग म्हणतात. पंचांगांत योग या अंगाचा समावेश वराहमिहिरानंतर करण्याची पद्धती प्रचा- रांत आली, असें तज्ज्ञांचें मत आहे. ज्योतिषशास्त्राचा याप्रमाणें उत्तम प्रकारें अभ्यास चालवून तें उत्तम अवस्थेस आणून पोहोचविण्याचें श्रेय आर्यभट्ट (जन्म शक ३९८ ), वराहमिहिर ( शक ४२७ ), ब्रह्मगुप्त ( शक ५२०) वगैरे प्राचीन पंडितांस आहे. त्यांच्या मागून या देशांत बरेच ज्योतिषशास्त्रज्ञ होऊन गेले. त्या सर्वांनी तत्कालिन साध्या उपकरणांच्या मदतीनें जे खगोलासंबंधानें शोध केले त्यांचा विचार केला असतां, या प्राचीन शोधकांच्या बुद्धिमत्तेबद्दल मोठें कौतुक वाटतें. जयपुर, मथुरा, काशी, उज्जनी, तक्षशीला वगैरे ठिकाण आकाशां- तील ग्रहांचे व नक्षत्रांचे वेध घेण्याच्या ज्या प्राचीन कालीं वेधशाला होत्या, त्यांत अनेक विद्यादेवीचे भक्त मोठ्या प्रेमानें रात्रंदिवस वेध घेत बसलेले असत. अशा प्रकारचा शोध करण्यांत या प्राचीन आर्यज्योतिषांना द्रव्यरूपाने मोठा मोबदला मिळत असे असे नाहीं; परंतु त्यांत त्यांना आनंद वाटे. असे शोधक बुद्धीचे निस्पृह वीर या देशांत पुनः अवतीर्ण होतील, तेव्हांच आपला भाग्योदय होईल. ज्योतिषशास्त्रावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. एकंदर १८ सिद्धांत लिहिले गेले असे सांगतात. त्यांपैकी पराशरतंत्र, गर्गसंहिता, ब्रह्म- सिद्धांत, सूर्यसिद्धांत, वसिष्टसिद्धांत, रोमकसिद्धांत, पुलिशसिद्धांत हे प्रसिद्ध आहेत. या शेवटच्या पांच सिद्धांतांवरून वराहमिहिरानें पंचसिद्धांतिका हा ज्योतिष ग्रंथ लिहिला आहे.

 कार्लेकरून खगोलशास्त्राचा अभ्यास मागे पडून फलज्योतिष पुढे आलें. सूर्य, चंद्र व त्यांच्याहून लक्षावधिपट मोठे असणारे आणि नक्षत्र या नांवानें