पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९)

विशाखा, ज्येष्ठा, अषाढा, श्रवण, भाद्रपदा आणि अश्विनी हीं नक्षत्रें अनुक्रमें कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या महिन्यांच्या पौर्णिमेस असावयाचीं. परंतु सध्यां पौर्णि- मेच्या मागेंपुढे त्यांचा उदय होत असल्याचें दिसून येतें. श्रावण शु. १५ स श्रवण नक्षत्र नसल्यामुळे कधीं कधीं श्रावणी ( उपाकर्म विधि) करण्याचें अन्य तिथीवर ढकलण्यांत येतें, हे आपण पहातों. संवत्सर, मास यांस नांवें देण्यांत आली. त्याच प्रमाणे महिन्याचे चार भाग पाडून एका भागांत

सात दिवस किंवा सात वार

ठरविण्यांत आले. वारांचीं सात नांवें वेदांत कोठें नाहींत. वार यांच्या ऐवजी वासर हा शब्द ऋग्वेदांत दोन ठिकाणीं आढळतो. अथर्व ज्योतिषांत

 आदित्यः सोमो भौमश्च तथा बुधबृहस्पती ।

 भार्गवः शनैश्चरश्चैव एते सप्त दिनाधिपाः

असे ह्मटलें आहे. अर्थात् सध्यां जीं नांवें वारांस आहेत, तींच अथर्व ज्योति-- षाच्या कालीं प्रचारांत होतीं हैं उघड आहे. याज्ञवल्क्याच्या स्मृतींत

 सूर्यः सोमो महीपुत्रः सोमपुत्रो वृहस्पतिः ।

 शुक्रः शनैश्चरो राहुः केतुश्चैते ग्रहाः स्मृताः ॥

अशीं नवग्रहांचीं जीं नांवें दिलीं आहेत, त्यांतून पहिली सात वारांसंबंधी आहेत, हे उघड दिसतें. यावरून याज्ञवल्क्य स्मृतीच्या काली रविवार वगैरे दिवसांची नांवें प्रचारांत असावीं. वारांची उत्पत्ति, निरनिराळ्या देशांतील वार पद्धतीचें साम्य वगैरे गोष्टी लक्षांत घेऊन वारांची नांवें हिंदूंनी परकीय नाम- पद्धतीस अनुसरून घेतलीं असें ज्योतिषशास्त्रविशारदांचें मत आहे.

 सध्यां जी पंचांगाची पद्धति प्रचारांत आहे तिच्याबद्दल विचार करूं.

पांच अंगें ज्याला आहेत तें पंचांग

होय. हीं पांच अंगें झटलीं ह्मणजे तिथि, वार, नक्षत्र, योग आणि करण ह्रीं होत. अमावास्येच्या दिवशीं सूर्य व चंद्र एके ठिकाणीं येतात. परंतु चंद्र प्रत्यहीं सूर्यापासून पौर्णिमेपर्यंत पृथ्वीच्या दुस-या बाजूम जातो; व पुनः सूर्याच्या बाजूस वळून अमावास्येस त्याच्या जवळच्या रेषेंत येतो. याप्रमाणे एका चांद्र- मासांत त्याची ३६० अंश गति होते. या ३६० अंशाच्या ३० तिथि गणतात. झणजे १ तिथीस चंद्र व सूर्य यांच्यांत १२ अंशांचें अंतर पडतें; किंवा असेही