पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६)

 वसंतादि पहिले तीन ऋतु देवांचे असून शेवटचे तीन पितरांचे आहेत. या प्रकारची कल्पना समाजास अत्यंत मान्य झाली होती म्हणूनच महाभारतकालीं इच्छामरणी भीष्मपितामहानें पितरांच्या ऋतूंत प्राणत्याग करण्याचें बंद केलें. विषुवाचें ज्ञान प्राचीनकालीं चांगलें झालें होतें. तैत्तिरेय संहितेंत

आदित्यः षण्मासो दक्षिणेनैति षडुत्तरेण

अर्से म्हटले आहे. या सर्व ऋतूंत 'तस्य ते वसंतः शिरः' असे म्हणून वसं- तास अग्रमान दिला है योग्यच आहे. चंद्रकलेचें निरीक्षण करण्यांत येऊ नक्षत्रमार्गानें चंद्राची गति ऋग्वेदाच्या कालीं जाणली होती. (ऋ. मं. ८-३ व मं. १०-८५.) रामायण-महाभारतकालीं यासंबंधानें विशेष शोध करण्यांत आले व चंद्रमाच्या मार्गांतील २७ नक्षत्रांना नांवें देण्यांत आलीं. ज्योतिषाचा अभ्यास करणारा व तत्संबंधीं शोध करणारा एक निराळा वर्ग पुढे आला. त्यास नक्षत्रदर्श किंवा गणक हें नांव पडलें. ( शुक्लयजुर्वेद ३०-१०-२० ). यज्ञयागादिक करणें तीं अमुक नक्षत्रे उदयास आल्या वेळीं करावी, असे ब्राह्मणकारांनी ठरविलें. कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, फल्गुनी, हस्ता, चित्रा या नक्षत्रांचे दर्शन झाल्यावर कोणकोणते यज्ञ करावे हें शतपथ ब्राह्मणांत सांगि तलें आहे. ( २, १२). सूर्याचा प्रकाश ऋतुपरत्वें दिवसाच्या अधिकउण्या भागांत प्राप्त होत असतो, हें बारकाईनें ठरवून त्याला जुळता असा यज्ञविधि ऐत्तरेय ब्राह्मणांत सांगितला आहे. नक्षत्रांच्या मार्गानुरोधानें चंद्राची गति ठर- विण्यापूर्वी वर्षांच्या

बारा महिन्यांचीं प्राचीन नांवें

पुढीलप्रमाणें होतीं:- १ मधु, २ माधव, ३ शुक्र, ४ शुचि, ५ नभसू, ६ नभस्य, ७ इष, ८ ऊर्ज, ९ सहस्, १० सहस्य, ११ तपस् आणि १२ तपस्य. याशिवाय सौरमानाप्रमाणें चांद्रमासाच्या गणतीवरून जो एक मासाचा फेर पडत असे, त्यास योग्य कालीं अधिक मासांत गणून 'संसर्प' या नांवानें संबोधित असत. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळांत ( सूक्त २५-८) असे म्हटले आहे कीं,

वेदमासो धृतव्रतो द्वादश प्रजावतः वेदाः य उपजायते ॥

 अर्थ - (वरुण ) आपल्या आज्ञा सर्वांस मानावयास लावीत असून त्यास द्वादश मासांचें ज्ञान असतें. त्यापैकी प्रत्येकांत लोकसंख्येची एकसारखी वृद्धि होत असते. शिवाय त्यास जोडूनच जो महिना कधीं कधीं येतो, त्याचीही
·