पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) हे ३६० दिवसांचे द्योतक असून दिवसरात्र अर्शी जोडपीं मानल्यास ७२० दिनभाग होतात. ज्योतिषशास्त्रांत विशेष प्रगति होत गेली, तसतसे सौर व चांद्र वर्षांचे दिवस नक्की ठरविण्यांत येऊन पांच सौरवर्षांचें एक लहान युग व पांच गुरुवर्षांचें ( किंवा बार्हस्पत्य वर्षांचें ) म्हणजे ६० संवत्सराचें एक युग अशी गणना होऊं लागली. पंचवार्षिक युगांची जीं वर्षे, त्यांची नांवें संवत्सर परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर व इद्वत्सर अर्शी होतीं. ६० सौरमास किंवा ६२ चांद्रमासांचें हें युग असून संवत्सरास ३५५, परिवत्सरास ३५४, इदावत्स- रास ३८४, अनुवत्सरास ३५४, व इद्वत्सरास ३८३ याप्रमाणे दिवस मोजीत असत. यांच्याप्रीत्यर्थ प्रत्येक वर्षी यज्ञांत आहुती देण्यांत येत. सांप्रत या युगाचा प्रचार नाहीं. बृहस्पतीस सूर्याभोंवर्ती फिरण्यास अजमासे १२ वर्षे इतका काल लागतो; अर्थात् बार्हस्पत्य किंवा गुरुवर्ष वर्षीचें झालें. अर्शी ५. गुरुवर्षे यांत ६० संवत्सरांचा समावेश होत असून प्रत्येकास नांव देण्यांत आलें आहे. प्रभवापासून क्षयापर्यंत ६० संवत्सरें आजमितीसही प्रचारांत आहेत. सूर्यरश्मीच्या योगानें शीतोष्णतेचें मान नियमितपणें बदलत जाऊन पृथ्वीवरील स्थिरचर पदार्थांवर जो परिणाम होतो, त्याचेंही सूक्ष्म निरीक्षण करण्यांत येऊन हैं स्थित्यंतर घडवून आणणाऱ्या कालावधीस ऋतु हें नांव देण्यांत आलें. अर्थात् सूर्य हाच ऋतु होण्याचं कारण आहे हें प्राचीन आर्यवरांस ठाऊक होतें; ह्मणून त्यांनी झटले आहे कीं, पूर्वाामनु प्रदिशं पार्थिवानामृतून् प्रशासद्विदधावनुष्टु ॥ ऋ० १-९५-३. 'सूर्य ऋतूंचें नियमन करून पृथ्वीच्या पूर्वादि दिशा एकामागून एक निर्माण करतो. ' प्रत्येक दोन महिन्यांचा एक ऋतु असे मानून तैत्तिरेय संहितेंत वसंत, ग्रीष्म, वर्ग, शरद्, हेमंत, शिशिर हीं सहा ऋतूचों नांवें दिलों आहेत. क्वचित् ठिकाणी हेमंत व शिशिर यांचें एकीकरण करून ५ ऋतु मानलेले दिस तात. या सहा ऋतूंपकी वसंतो ग्रीष्मो वर्षाः । ते देवा ऋतवः शरद्धेमंतः शिशिरस्ते पितरो + + + स यत्रोदगावर्तते । देवेषु तर्हि भवति + + यत्र दक्षिणावर्तते पितृषु तर्हि भवति- (शत - बाह्मण. २ - १ )