पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 8 ) स वा एष न कदाचनास्तमेति नोदेति तं यदस्त मेतीति मन्यं- तेन्ह एव तदंतमित्वाथात्मानं विपर्यस्यते रात्रीमेवावस्तात् कुरुतेहः परस्तादथ यदेनं प्रातरुदेतीति मन्यंते रात्रेरेव तदंत- मित्याथात्मानं विपर्यस्यतेऽ हरेवावस्तात् कुरुते रात्रीं पर- स्तात् स वा एष न कदाचन निम्नोचति ॥ अर्थ – ( हा सूर्य कधींच अस्त पावत नाहीं किंवा उदय पावत नाहीं. अस्त म्हणजे सूर्य दिवसाच्या अंतास जाऊन स्वतःस उलट फिरवितो-एकीकडे रात्र व दुसरीकडे दिवस करतो. उदय याचा अर्थ असा कीं रात्रीचा तो अंत करून स्वतःस उलट फिरवितो. अलीकडे दिवस व पलीकडे रात्र करतो. वस्तुतः सूर्य कधींच अस्त पावत नाहीं. ) सूर्य व चंद्र यांच्यामुळे पृथ्वीवर प्रकाश व अंधकार यांचें नियमन होऊन शीतोष्णतेमुळे सृष्ट पदार्थाचें स्थित्यंतर होत असतें. वेदकालींच ज्योतिषशास्त्रज्ञांनी काल- मानाचें माप ठरवून वर्ष, ऋतु, मास, वार हे त्याचे मुख्य भाग पाडले. सूर्याभोवती पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास जो काल लागतो, त्यास सौरवर्ष असे म्हणतात. ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटें, ४७॥ सेकंद इतका काल लोटल्यास एक वर्ष पूर्ण होतें. परंतु पृथ्वीभोंवतीं चंद्रही फिरत असून २९ दिग्स, १२ तास, ४४ मिनिटें, २८ सेकंद इतक्या कालांत एक याप्रमाणे १२ प्रदक्षिणा संपल्या म्हणजे चांद्रवर्ष पूर्ण होतें. यास ३५४ दिवस, ८ तास, ४८ मिनिटें, ३३.५५ सेकंद इतका काल लागतो. अर्थात सौर वर्षांहून चांद्रवर्ष लहान आहे. अजमास ३३० दिवसांत चांद्रवर्ष संपतें असें वेदकालीन आर्यांनी जाणलें होतें, हें पुढोल सूकावरून स्पष्ट होतें. द्वादशारं नाहेतजराय ववर्ते : चकं परि द्यामृतस्य | आ पुत्रा अग्नं मिथुनासोः अत्र सतः शतानि विंशतिश्च तस्थुः ॥ ऋ. १-१६४-११. 'सत्यभूत ( आदित्याचें ) १२ अरे असलेले चक्र धुलोकासभोवन सदैव भ्रमण करीत अमतें तरी तें नाश पावत नाहीं. हे अम्रे, या चक्रावर पुत्रांचीं ७२० जोडपों बसली आहेत.' त्याच सूतांन पुढे असें ह्मटलें आहे की, 'त्या चाकाला शंकूप्रमाणे ३६० चंवल अरे लगत लावलेले आहेत. याचा अर्थ असा होतो कों, संवत्सर है चक अनून त्यास १२ मास हे १२ अरे होत. ३६० अरे