पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३) सात मन्वंतरें यावयाची आहेत. प्रत्येक मनु ७१ महायुगे असावयाचा आणि एक महायुग ३३, २०,००० वर्षेपर्यंत चालावयाचें. आतांपर्यंत २७ महायु झालीं आणि सध्यां २८ वें महायुग चालले आहे. या २८ व्या महायुगां- तील कृतयुग ( १७,२८,००० वर्षे ) त्रेतायुग ( १२,९६,००० वर्षे ), द्वापर युग ( ८,६४,००० वर्षे ), हीं तीन लहान युगें संपून चौथें कलियुग सध्या चाललें आहे. हें कलियुग ४,३२,००० वर्षेपर्यंत चालू राहील. त्यांतून सध्यां ५०२२ वर्षे संपली. या सहस्रांनीं नव्हे लक्षांनीं मोजण्याच्या आंकड्यावरून जगाच्या अनाद्यनंतत्वाची साधारणपणें कल्पना होण्याजोगी आहे. वेदकालीं ऋषिजनांनीं सूर्यचंद्रादिकांची प्रार्थना करून त्यांच्याप्रीत्यर्थ यज्ञयागा- दिक चालवीत असतां मास, ऋतु, नक्षत्र वगैरेसंबंधानें कांहीं सिद्धांत ठरविले. त्यांवरून आर्यावर्तत ज्योतिषशास्त्राचा उदय झाला. पृथ्वीस व सर्व भुवनांस सूर्य हा आधारभूत आहे असे ठरवून त्याची अनेक प्रकारें स्तुति केलेली आहे. वेदांत विष्णु हा शब्द सूर्यवाचक असून त्याच्यामुळे धनधान्य व सर्व प्राणिमात्र यांची उत्पत्ति झाली व पोषण होत असतें, असें दर्शविलें आहे:- - सवितारं यजति यत्सवितारं यजति तस्मादुत्तरतः पश्चादयं भूयिष्ठं पवमानः पवते सवितृप्रसूतो ह्येष एतत्पवते ॥ ( ऐ. ब्रा. २-७ ) अर्थ – होता सवित्याचें यजन करितो म्हणून उत्तर पश्चिमेकडून फार वारा वाहतो. कारण तो सवित्यापासून उत्पन्न होऊन वाहतो. यावरून स्पष्ट होतें कीं, उत्तर पश्चिमेकडून वारा वाहण्यास सूर्य कारणीभूत आहे हे देखील प्राचीनकाळीं जाणलें होतें. ऋग्वेदांत सूर्याला 'सप्त रश्मयः' असे म्हटलें आहे. यावरून सूर्यकिरणें सात प्रकारची आहेत, असा जो बोध होतो, तो सूर्यकिरणांत सात रंग असल्याबद्दलच्या आधुनिक सिद्धांतास जुळतो असें म्हणतां येईल. सूर्याचा उदय व त्याचा अस्त यासंबंधानें विचार करून प्राचीन लोकांनीं जें मत नमूद केलें, तेंही फार महत्त्वाचे आहे. ऐत्तरेय ब्राह्मणांत ( १४-६ ) असें म्हटले आहे कीं:-