पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १२५. हें आपण जाणतो. परंतु फार कालपर्यंत जनावरांचें दूध ओढीत गेल्यास त्यांनाहि क्षय होईल, इकडे लक्ष जात नाहीं. शहरांतील गोठ्यांत राहणा- यांपैकी शेकडा २५ जनावरांना क्षय असतो, असें पशुवैद्यांचें मत आहे. क्षय असला तरी त्याचीं बाह्य चिन्हें लवकर दृष्टीस पडत नाहींत. चांगली जनावरें व क्षयी जनावरें एकत्र बांधिल्यानें कफाचे द्वारां चांगलीं जनावरेंहि दूषित होतात. त्याचप्रमाणे क्षयी माणसाच्या थुंकीनेंहि त्यांना संपर्क पोहोचतो. प्रत्यक्ष स्तनाला क्षयग्रंथी असल्यास त्यांचा प्रसार दुधावाटे होतो. एरव्ही कमी होतो. परंतु जनावरांचे शेणांत पुष्कळ ग्रंथी बाहेर पडतात व स्तन चांगले असून स्वच्छता न ठेविल्यास त्यांचा प्रसार दुधांत होईल हें ध्यानांत ठेवावें. स्तनांत दूध नसतांना तें चाचपून पहावें. त्यांत गांठी असल्यास किंवा त्याचा आकार उंचनीच असून तें कठीण असलें तर क्षय- ग्रंथी तेथे आहेत अशी शंका घेऊन प्रत्येक स्तनांतील थोडें थोडें दूध निरनिराळ्या भांड्यांत धरून त्याची परीक्षा सूक्ष्मदर्शकानें करावी. पांच वर्षांखालील क्षयी मुलांच्या मरणोत्तर परीक्षेअंती असे आढळून आलें आहे कीं, शेंकडा २५ मुलांमध्ये गाईच्या क्षयग्रंथी सांपडल्या. ह्या- वरून बाल्यावस्थेंत दुधापासून पुष्कळांना क्षय होतो हें सिद्ध होतें. क्षयग्रंथींचें आंतड्यांवर आक्रमण होऊन तेथें क्षतें वगैरे पडल्याचें आढळत नाहींत. बहुधा ते आंतड्यांतून मेसेंटरिक पिंडांत व नंतर फुप्फु- सांत जात असावेत. गरिबांच्या मुलांची पोटें मोठीं असतात. त्या आजाराला टेबीज मेसेंटरिका म्हणतात. हा श्रीमंतांत होत नाहीं. गरिबांच्या मुलांना दूध मिळत नाहीं, व श्रीमंतांच्या मुलांना मिळतें, मग उलट गरिबांच्या मुलांना टेबीज मे सेंटरिका हा क्षयग्रंथीचा विकार का व्हावा असा प्रश्न उत्पन्न होतो. याचें उत्तर असें आहे कीं, गरिबांचीं मुलें घाणेरड्या जमिनीवर व अस्वच्छ जागेवर रांगतात, त्यांचे कपडे गलिच्छ असतात, हातांचे द्वारां व अस्वच्छ