पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ आरोग्यशास्त्र ज्या जनावराचें दूध आपण काढितों त्याच्या बऱ्या वाईट प्रकृतीचे `गुण दुधांत उतरतात. म्हणून जनावरें सुदृढ असून त्यांना शीघ्र किंवा विलंबी रोग नसावा. त्यांना स्पर्श-संचारी रोग असल्यास त्यांचा प्रसार त्यांच्या दुधाचे द्वारां होण्याची भीति असते. सोयरांतलें दूध कधींहि वापरू नये. त्या काळीं दाहयुक्त विकार व स्पर्श--संचारी विकार होण्याचा संभव असतो. आंबलेल्या दुधानें मुलांना मळमळ व अतिसार होतो, व दुधांत ऑइडिअम आल्बिकन्स जंतु असल्यास अर्भकाचे अन्ननळांवर त्याचें आक्र- मण होऊन त्यांना भ्रस (तोंड येणें ) होतो. पेनिसिल्लीअम, अॅस्परगीलस, म्युकार इ० जातींचे गोल्ड व फंगी दुधांत असल्यास जठराचा तीव्र क्षोभ होतो. स्तनांवरील चिरम्याची व गळवाची लस दुधांत गेल्यास अशाच भावना होतात. इ० स० १८८१ मध्ये अर्नेस्ट हार्ट यानें टायफॉईड ज्वराच्या ५०, लोहितांग ज्वराच्या १५, व डिफ्थेरिआच्या ६ सांथी दूषित दुधामुळे उत्पन्न झाल्या,असें सविस्तर माहिती देऊन दाखविलें. टाइफॉईड ज्वर भांडी धुण्यांत `किंवा मिसळींत वापरण्यांत येणारे दूषित जलाच्या संपर्कानें दुधाचें द्वारां पसरतो. कधीकधीं टायफॉईड-वाहकांच्या सान्निध्यामुळेंहि दूध दूषित होतें. लोहितांग ज्वराचें विष प्रत्यक्ष मनुष्यापासून पोहोंचतें. जसें गवळ्याच्या घरांत तसला आजारी असणें. कधीं कधीं जनावराला हा रोग होऊन त्यानें दूध बिघडते. घटसर्प या विकारांतील जंतूंचा प्रवेश दुधांत मनुष्यापासून होतो. स्तनांच्या विकाराने घशाचा पूयजन्य दाह (सूज) होतो. शेतांत राहणाऱ्या जनावरांना मुबलक उजेड व भरपूर स्वच्छ हवा - मिळाल्यानें क्षय होण्याचा संभव कमी असतो. शहरांत व गोठ्यांत राह- णाऱ्या जनावरांना अपुरी हवा व अंधेर ह्यांमुळें क्षय अधिक वेळां होतो. फार काळपर्यंत आंगावर पाजिल्यानें स्त्रियांना क्षय होण्याचा संभव असतो,