पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही



१२६ आरोग्यशास्त्र - रबराच्या बोंडशीने त्यांच्या मुखांत केर वगैरे जातो, ह्या रीतीनें मानव- संसर्गानें क्षयजंतूंचा प्रवेश त्यांच्या आंगीं होतो. क्षयप्रतिबंधक लस - टोचल्याने ह्या आजाराच्या प्रसारास पुष्कळ आळा बसतो पण ह्या लशीचा अम्मल दोन वर्षे टिकतो. दुधांतील भेसळ दुधांत बहुतेक सर्वदा भेसळ असते. ह्या कामी खालील पदार्थ मुख्यतः घालतात. (१) जल हैं बहुधा फार अशुद्ध असतें. (२) साखर. (३) पुष्कळ लोक साय काढून घेतात व घनत्वांत फरक दिसूं नये म्हणून पाणी घालतात अथवा रात्रीचे दुधांतील साय काढून घेतात व सकाळच्या दुधांत मिसळतात. (४) स्टार्च, तांदुळाचें पीठ अथवा आरारोट मिसळतात. (५) निरनिराळ्या जातींच्या जनावरांचीं दुधें एकत्र मिसळतात. तपासणीः—तपासणीच्या सुलभ सहा रीति दिल्या आहेत. (१) दुग्धमापकः - दुधांत फक्त पाण्याची मिसळ असल्यास दुग्धमाप- काचा उपयोग होतो. परंतु जर दुधांत साखर मिसळली असली किंवा साय काढून त्यांत पाणी मिसळले तर ह्याचा उपयोग बरा होत नाहीं. ६०° अंश फॅरेनहैट उष्णतामानावर ही तपासणी करावी. (२) पाणी घातलेलें दूध कांचपात्रांत घालावें. दुधाच्या वरील कंगोऱ्या चे ठिकाणीं निळसर रेषा दिसते. दुधांत पे भाग पाणी असेपर्यंत ही नुसत्या डोळ्यांनी दिसते. (३) दुधाच्या विशिष्ट गुरुत्वांत किंवा साईच्यामध्यें न्यूनता ह्यावरून दुधांत पाणी मिसळल्याचे समजते.