पान:आरोग्यविज्ञान.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ कानकोरण्यानें अगर कागदाची सुरळी करून कान कोरूं नये, त्यानें कानाच्या पडद्याला इजा होते. कानांतील मळ आपोआप बाहेर पडून जाण्याची व्यवस्था असते. आंघोळ करतांना व आंग पुसतांना कानांत बोट फिरवून स्वच्छता ठेविली म्हणजे झालें. कानाला कंडू अगर ठणका लागल्यास तेल घालूं नये; ताजें, निरसें दूध घालावें अगर वाफारा द्यावा. ह्या कामी गाईचें दूध उत्तम. येथपर्यंत शारीरिक स्वच्छतेवर आरोग्य कसें अवलंबून असतें ह्याचें विवेचन झालें. पण नुसत्या शारीरिक स्वच्छतेनें काम भागत नाहीं. तिला मानसिक स्वच्छतेची जोड अत्यावश्यक आहे. शारीरिक स्वच्छतेचे नियम पाळूनही मन जर अखच्छ ह्मणजे रोगी असेल, तर शरीराचें नुकसान झाल्यावांचून कधीं राहणार नाहीं. ही गोष्ट मनावर पक्की बिंबली पाहिजे. शरी- राबरोबरच मन निर्मळ, सुविचारी, जोमदार कसें बनेल याची काळजी बाळगली पाहिजे. ती न बाळगली तर पुढें पस्ताव्याचा प्रसंग येतो, पण तेव्हां शरीराचें झालेलें नुकसान भरून येणें शक्य नसतें. शरीर वाढत असतें त्याच वेळीं त्याच्या वाढीची योग्य काळजी बाळगली पाहिजे. रोग दुःसाध्य झाल्यावर औषधाची धडपड करून काय होणार ? वाईट पुस्तकें, वाईट चित्रे, वात्रट नाटकें, बाष्कळ कादंबन्या, गचाळ गप्पा व गाणी अशांसारख्या गोष्टींपासून अगदी अलिप्त राहिलें पाहिजे. ह्या बाबतींत मन अति निश्चयी व कठोर बनलें पाहिजे. वाईट गोष्ट म्हटली कीं ती करा- वयाची नाहीं, नव्हे, तत्संबंधीं अगदीं विचार देखील करावयाचा नाहीं असा नियम पाहिजे. ह्या बाबतींत अगदीं लप्करी हुकुमासारखी