Jump to content

पान:आरोग्यविज्ञान.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९ सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. ही नकाराच्या बाजूची गोष्ट झाली. पण मन ही अशी कांहीं चमत्कारिक चीज आहे कीं ती कधीं स्वस्थ वसूं शकत नाहीं. कांहीं तरी उद्योग लागतो. झोंपेंत त्या शक्तीला जागेपणीं सारखा सुद्धां गाढ झोप न आली करिते, व आपल्याला खप्में तर ही शक्ति रिकामा उद्योग सुरू पडतात. तेव्हां ह्या मनाला कांहीं तरी चांगला उद्योग नेहमीं लावून द्यावा. वाईट संवय जशी क्रमशःच लागते, पण लागली म्हणजे अगदीं शिरजोर होऊन बसते, त्याचप्रमाणें सुविचार करण्याची मनाला नेहमीं संवय ठेविली ह्मणजे त्यांचाही मनावर इतका परिणाम होतो कीं मन वाईट विचारांना मुळीं थाराच देत नाहीं. तेव्हां ह्यासंबंधीं नियम दोनः एक, वाईट गोष्ट झटली कीं तिच्यावर विचार करीत न बसतां एकदम बाजूला सारणें, व दुसरा, मनोनिग्रह व सुविचार उत्पन्न करितील अशीं थोर पुरुषांचीं चरित्रे व इतर पुस्तकें वाचून त्यांवर विचार करणें. ह्या दुसऱ्या नियमांसंबंधीं रोज आपल्या हातून कांहीं झालें कीं नाहीं हें पाहिलें पाहिजे. रोज निजावयाच्या पूर्वी दिवसांत आपण काय काय केलें ह्याचा आढावा घ्यावा व वाईट गोष्टींबद्दल पश्चात्ताप पावून पुन्हा तसें न करण्याचा निश्चय करून सद्बुद्धि देण्याविषयीं परमेश्वराची प्रार्थना करावी. तेव्हां आरोग्याचे नियम अगदी थोडक्यांत सांगावयाचे ह्मणजे रोज मलशुद्धि, त्वचाशुद्धि व चित्तशुद्धि नीट झाली कीं नाहीं हें पाहणें व प्रकृतीस कांहीं विकार झालासा वाटतांच त्याला उपाय करणें हे होत.