पान:आरोग्यविज्ञान.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७ अगदी साधा आहे. तो हाच कीं, दिवसांतील काही वेळ, लांबचे- जितकें लांब पहावेल तितक्या लांबचे पदार्थ नीट न्याहाळून पाहाणे. फुटबॉलसारख्या खेळानेंही हें काम होतें. डोळा हें अति नाजूक पण अति महत्त्वाचें इंद्रिय असल्यामुळे त्याला विशेष जपलें पाहिजे, व फार वाचन, लेखन करणान्यांनी तर अतिशय जपलें पाहिजे. डोळे थंड पाण्यानें जितके वेळां धुवावे तितके चांगले. चाचतांना उजेड डाव्या बाजूनें पुस्तकावर पडेल असें करावें. पुस्तक फूट सव्वा फूट अंतरावर धरावें. दिव्याशीं वाचतांना उजेड डोळे दिपण्याइतका असूं नये व अंधुकही असूं नये, व दिव्याची ज्योत दिसूं नये. राकेलच्या दिव्यापेक्षां मेणबत्तीचा उजेड डोळ्याला चांगला. दिवा शांत जळत असावा, फडफडूं नये. धावत्या वाह- नांत बसलें असतां वाचूं नये. ताठ बसून वाचावें. मार्गे रेळून अगर उपडें उताणें निजून वाचूं नये. अगदीं वारीक टाइपाचीं पुस्तकें वाचू नयेत. डोळ्याला हिरव्या रंगाकडे पाहून बरें वाटतें, म्हणून घरांचा रंग हिरवा अगर अस्मानी असावा, पांढऱ्याने डोळा दिपतो, तांबड्यानें फारच त्रास होतो. डोळ्याला नेहमी उजेड पाहिजे. लहान मूल रडत असले तर नुसतें उजेडांत ठेविलें कीं बरेच वेळां गप्प राहातें. हल्लीं कांहीं डॉक्टर सूर्यकिरणें व उजेड ह्यांचा रोग बरे करण्याकडे उपयोग करूं लागले आहेत. बुटाला अगर जोड्याला नाल, पत्र्या वगैरे मारू नये, त्याने डोळ्याला इजा होते. अनवाणी चालण्यानेंही डोळ्याला त्रास होतो. पायाचा व डोळ्याचा आपल्याला वाटतो त्यापेक्षां जास्त संबंध आहे. डोळ्याची आग होत असली तर आपण पायाला तूप चोळतों ह्यावरून हाच संबंध व्यक्त होतो.