पान:आरोग्यविज्ञान.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ उपढें निजणें वाईट. उताणें निजल्यानें कण्यांतील मज्जारज्जूवर दाब पडतो व त्यास विश्रांति मिळत नाहीं; उपडें निजल्याने डोळे बिघडतात. डोक्याखालीं एखादीच पातळशी उशी घ्यावी. फार उसें घेतल्यानें मानेवर ताण पडून रक्तप्रसारास अडथळा होतो, त्यामुळे झोपेचा उपयोग मेंदू ताजातवाना करण्याकडे व्हावयाचा तो चांगलासा होत नाहीं. आपला डोळा फोटो काढणान्याच्या कॅमे-यासारखा आहे. फोटो नीट निघण्याकरितां फोटोग्राफर कॅमे-यांतील भिंग जवळ अगर दूर करितो. डोळ्यांतील भिंग ह्याप्रमाणे पुढे मागें होत नाहीं. तेथील रचना अशी आहे कीं, पदार्थ जवळ अगर लांब असेल त्याप्रमाणें ह्या भिंगाची ठेवण अगर अंतर्रचनाच बदलावी. हें काम स्नायूंच्या साहाय्यानें होतें. जवळचा पदार्थ बराच वेळ पहात असतां एकदम लांबवर नजर फेंकली तर क्षणभर तो लांबचा पदार्थ नीट दिसत नाहीं. ह्याचें कारण हेंच कीं त्या भिंगाची अंतर्रचना बदलावयाला तेवढा वेळ लागतो. अर्थात् विद्यार्थ्यांच्या डोळ्याला जागेपणापैकी बरेचसे तास फूट सव्वा फूट अंतरावरील बारीक अक्षरें वाचावीं लागत असल्यामुळे, त्यांच्या डोळ्याला जवळच्या गोष्टी पहाण्याची विशेष संवय होते, व त्याच प्रमाणांत लांबचे पदार्थ तितकेंच लक्ष्य देऊन पहाण्याची संवय जर त्यांनीं ठेविली नाहीं, तर जवळचे पदार्थ पहाण्याकरितां लागत असणारी भिंगाची अंतररचना कायम होऊन अशा विद्यार्थ्यांची " शॉर्टसाइट" ( संकुचित दृष्टि ) होते, म्हणजे त्यांना लांबचें दिसत नाहीं. तेव्हां अशी शॉर्टसाइट होऊ न देण्याचा उपाय