पान:आरोग्यविज्ञान.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३ पाण्यानें करणें चांगलें, त्यानें रक्तप्रसाराला जोर येतो व ज्ञानतंतु शांत होतात. थंड पाणी मेहनत वगैरे करूनही नच सोसेल तर कोमट पाणी वापरावें. अति कढत पाण्याने आंघोळ करणें चांगलें नाहीं. त्वचेवर तेलासारख्या पदार्थाचें एक पातळ पुट असतें, त्यांत घाण पदार्थ चिकटून बसतात. साबण लाविल्यानें हें तेलाचें पुट नाहींसें होतें. त्वचेच्या क्रियेला ह्या पुटाचा उपयोग असतो, तेव्हां अति साबण वापरणे इष्ट नाहीं. साबण वापरावयाचा तो चांगला वापरावा, म्हणजे त्वचा खरबरीत न होतां मऊ राहील. आंघोळ करितांना आंगाला वान्याचा झोत लागूं नये, त्यानें आंगांत शिरशिरी येऊन ताप येण्याचा संभव असतो. वगैरे जिरल्यावर आंघोळ करणें फार चांगलें, मेहनत होऊन घाम त्यानें मेहनतीचा पूर्वीइतकी ऊब जेवल्यावर दोन शरीरास खरा उपयोग होतो. आंघोळ झाल्यावर आंगांत येईपर्यंत जेऊं नये, त्यानें अपचन होतें. तासांच्या आंत आंघोळ करूं नये, त्यानेंही अपचन होतें. प्रकृति बरोबर नसल्यामुळे आंघोळ करणे इष्ट नसेल तर ओल्या फडक्यानें अगर स्पंजनें आंग स्वच्छ पुसून काढावें. आंघोळ झाल्यावर कोरड्या वस्त्रानें आंग पुसून कोरडें केलें पाहिजे. ओल्या धोतरानें आंग कोरडे करण्याची कल्पना बरोबर नाहीं. थंड पाण्याने आंघोळ करणें चांगलें खरें पण तशी आंघोळ केल्यावर शिरशिरी भरत असेल, व व्यायाम केला तरीही शिरशिरी भरण्याचें बंद होणार नाहीं, तर थंड पाणी सोसत नाहीं असें म्हटलें पाहिजे. समुद्रस्नान करणें फार हितावह आहे.