पान:आरोग्यविज्ञान.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ रोज तोंड स्वच्छ धुतलें पाहिजे. जिभेवर व दांतांवर नेहमीं एक तऱ्हेचें पुट बसत असतें. त्यांत सूक्ष्म, विषारी रोगजंतु उत्पन्न होत असतात. तेव्हां हैं पिंवळें पुट रोज काढून न टाकले तर अन्नाबरोबर रोगजंतु पोटांत जाऊन अपाय करितात. शिवाय, मज- बुतीकरितां आपले दांत एकमेकांला चिकटून बसविलेले आहेत व प्रत्येकावर पांढरें कवच आहे, त्यावर बसणारें पिंवळें पुट नीट काढून न टाकिलें तर दांतांत भेगा पडतात, पांढरें कवच कुजूं लागतें, दांत किडतात, निःशक्त होतात व अकाली पडतात. मग पस्तावा होतो. ह्या सगळ्याला उपाय अगदीं साधा, रोज दांत स्वच्छ धुवून जीभ घांसणें. आंघोळ करण्यांत केलेल्या आळसामुळे, ज्याप्रमाणें कांहीं लोकांनीं कांख वर केली असतां रस्त्यावरील गटारांत उतरल्याचा भास होतो, त्याचप्रमाणे तोंड धुण्यांत केलेल्या हयगयीमुळे कांहीं लोकांच्याजवळ बिलकूल बोलूं नयेसें वाटतें. कारण ते बोलले कीं, विषारी दुर्गंधी वायूंचा नुसता मारा होतो. • तोंड धुतांना हिरड्या सोलल्या न जातील अशी खबरदारी घेतली पाहिजे. कांहीं खाल्लें कीं खच्छ पाण्याने बरेच वेळां गुळणे करावे, आळस करूं नये. दांत कोरण्यानें दांत कोरून त्यांत भेगा पाडूं नये. नखें फार वाढूं देऊं नयेत व त्यांच्या खालीं काळी घाण जमूं देऊ नये. नखें दांतांनी कुरतडूं नयेत. केंस विंचरून, धुवून स्वच्छ ठेवावे. कपडे नेहमीं स्वच्छ असावे. त्वचेलगत वापरले जाणारे कपडे रोज धुवावे. रंगाच्या कपड्यांपेक्षां पांढरें कपडे वापरणें चांगलें,