पान:आरोग्यविज्ञान.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ अति व्यायाम करूं नये. व्यायामानंतर अगदीं गळल्यासारखें वाटलें व शोष पडला तर व्यायाम फाजिल झाला असें समजावें. खेळ खेळून अभ्यासाची हेळसांड करूं नये. मलशुद्धि साफ झाली नसतां व्यायाम करूं नये, त्यापासून अवष्टंभ होतो. जेवल्यावर अर्धाएक तासपर्यंत शारीरिक अगर मानसिक श्रम करूं नयेत. व्यायामानंतर घाम जिरेपर्यंत उघडें बसूं नये, त्यानें मूत्राशयाला विकार होतो; व कांहीं खाऊंही नये, त्यानें डिस्पेप्सिया ( अपचन हा रोग होतो. नंतरही चिवडा, भजी अशासारखे पदार्थ खाऊं नयेत, ह्यानेंही अपचन होण्याची भीति असते व शरीराला जरूर तीं द्रव्यें त्यांत नसतात. असो. तर चांगला घाम निघेपर्यंत मोकळ्या हवेंत सर्व शरीराला व्यायाम होऊन मनाला करमणूक झाली कीं नाहीं हें रोज पाहाणें हा आरोग्याचा दुसरा नियम होय. वेलिंग्टननें म्हटलें आहे कीं वॉटर्लूच्या यशाचें कारण इंग्लंडच्या मैदानांतील खेळच होत. आतां आंघोळीसंबंधी विचार करूं धामाच्या द्वारें शरीरांतील घाण बाहेर जावी म्हणून त्वचेंत जीं सूक्ष्म रंध्रे असतात तीं खच्छ करणें हाच आंघोळीचा मुख्य उद्देश आहे. तेव्हां हा उद्देश सिद्धीस जाईल अशा रीतीनें आंघोळ केली पाहिजे. नुसतें डोक्यावर पाणी ओतून उपयोग नाहीं, सर्व आंग नीट चोळून धुतलें पाहिजे. कंडू, खरूज वगैरेचें कारण मलशुद्धि नीट न होणें, अगर त्वचा साफ धुतली न जाणें हेंच असतें. हे रोग संसर्गानेंही होतात. आंघोळीला सकाळची वेळ चांगली. शारीरिक कष्ट करणारांनी संध्याकाळी करावी. गिरणींत वगैरे आंघोळ थंड