पान:आरोग्यविज्ञान.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१ त्याच- ह्मणण्यांत ज्याला आनंद वाटतो, तो गडी उत्तम समजतात; म्हणजे क्षणोक्षणी निस्वार्थबुद्धीचा धडा त्यांत मिळत असतो. प्रमाणें आज्ञाधारकत्व. कॅप्टननें नेमून दिलेली जागा सोडण्याचा मोह त्यांत कितीतरी वेळां पडतो, पण नियम आड येतो, व आत्म- संयमन व आज्ञाधारकत्व मनाला शिकावें लागतें. बाविसांपैकीं वीस गडी सारखे धांवत असतात, तेव्हां वीसपासून तीस मिनिटांच्या आंत सगळ्यांना हवा तेवढा व्यायाम होतो. प्रत्येक गड्याला खेळांत दरक्षणीं मजा वाटत असते. आपलाच भिडू कां होईना एकदां आउट होऊन मला बॅटिंग केव्हां मिळेल ह्याची फुटबॉलमधील गड्याला क्रिकेटप्रमाणें वाट पहावी लागत नाहीं. ह्या खेळांत रिकामा वेळही फुकट जात नाहीं. शरीर बांधेसूद व काटक बनतें व मनही जोमदार व धीट होतें. खेळ ऐन रंगांत कां असेना ? नियमाचें अतिक्रमण झाल्याक्षणीं पंच शिटी फुंकतो त्याबरोबर गडी थांबलेच पाहिजेत. ह्यानेंही आज्ञाधारकत्व व आत्मसंयमन हेंच शिकविलें जातें. तेव्हां व्यायाम तर व्यायाम, करमणूक तर करमणूक, शिवाय उत्तम गुणांचें शिक्षण, आणि पुन्हां वेळाचा खर्च थोडा, अशामुळे फुटबॉल हा उत्तम व्यायाम होय. व्यायामासंबंधी कांहींना खुराकाची मोठी काळजी पडते. पण शरीराला जेवण, आंघोळ ज्याप्रमाणें अवश्य, त्याचप्रमाणें अन्नपचन नीट होण्याला व्यायाम अवश्य होय, त्याकरितां निराळ्या खुरा- काची मुळींच जरूर नाहीं. शरीर विशेष जास्त व्यायाम करितो त्याची गोष्ट निराळी. जरूर असते. कमविण्याकरितां जो त्याला खुराकाची