________________
४० करमणूक करावी. पत्ते अगर सोंगट्या खेळणे ही अगदीं निरुप- योगी, बैठी करमणूक होय. सुविचार उत्पन्न करून मन तल्लीन होईल अशा तन्हेनें गाण्याचा उपयोग केला तर ती एक शेरीर व मन या दोहोंला उपयुक्त अशी करमणूक होईल. (२) मनुष्य हा प्राणी वाघलांडग्यासारखा एकलकोंडा नाहीं. तो समाजप्रिय आहे. तेव्हां त्याला लोकांशी मिळून मिसळून कसें वागावें हें शिकलें पाहिजे. आप्पलपोटेपणा न करितां चार लोकांबरोबर श्रमविभागानें एखादें कार्य करें तडीस न्यावें हें त्याला माहीत झालें पाहिजे. ह्या व इतर गोष्टी पुस्तकें वाचून येत नसतात तर प्रत्यक्ष आचरणानें येतात. तेव्हां एखाद्या व्यायामांत करमणूक होऊन ह्याही गोष्टी शिकण्याची जर संधि मिळेल तर तो व्यायाम उत्तम. अशा दृष्टीनें विचार करितां एकेकट्यानें व्यायाम करण्या- पेक्षां मैदानावरचे खेळ खेळणें उत्तम व खेळांतही फुटबॉल उत्तम. फुटबॉलमध्यें विशेष आहे तें हें कीं त्यांत विरुद्ध बाजूच्या गड्याकडून चेंडू घेऊन तो युक्तीनें विरुद्ध बाजूच्या गोलकडे आपणच एकट्यानें नेऊन पोचविणान्या गड्याला उत्तम म्हणत नाहींत, तर दुसन्या बाजूकडून चेंडू घेऊन आपल्या गड्याकडे देणें, त्यानें दुसन्याकडे देणें, त्यानें पुन्हा आपल्याच भिडूकडे असें करून, गोल मी केला असें म्हणण्यांत गर्व न मानतां, आम्ही सगळ्यांनी मिळून गोल केला असें १ गाण्यानें श्वासेन्द्रियें जोमानें चालूं लागतात, घाम येतो, व शरीराचें हित होतें.