पान:आरोग्यविज्ञान.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९ मनुष्यासारखें जावें म्हणून ज्याप्रमाणें तुम्ही अभ्यास करितां, त्याचप्रमाणें पुढील आयुष्य पुष्कळ जावें म्हणून शरीर निरोगी व सुदृढ त्याप्रमाणें वागा. असावें व तें सुखानें कसे बनवावें हें शिकाव व्यायाम नेहमीं मोकळ्या हवेंत करावा. रेंगाळत रेंगाळत फिरावयास जाणें व कोठेतरी गप्पा मारीत बसून घरी परत येणें हा व्यायाम नव्हे. व्यायाम असा पाहिजे कीं त्यानें शरी- रांतील सर्व स्नायूंना चलन मिळून चांगला घाम आला पाहिजे. पोहणें, धावणें, घोड्यावर बसणें हे उत्तम प्रकारचे व्यायाम होत. नमस्कार, तालीम, डंबेल्स, खोखो, आट्यापाट्या, टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल हे सर्व चांगले व्यायामच होत, पण ह्यांतील उत्तम कोणचा हे ठरविण्यापूर्वी आणखी एक दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. (१) व्यायामाइतकीच आपल्याला करमणुकीची आवश्यकता असते. शारीरिक अगर मानसिक श्रम करून दमल्यावर अगदीं निराळ्या प्रकारच्या गोष्टींत मन गुंतविणें ह्याला करमणूक म्हणतात. करमणूक म्हणजे विश्रांति नव्हे. करमणूक अशी असावी कीं तींत शक्य तर परिस्थिति, हवा, कल्पना हीं सर्व बदलून जावीत. करमणूक झाली तरी ती उपयुक्त असली पाहिजे. तिचा शरीर अगर मन सुधारण्याकडे उपयोग झाला पाहिजे. शारीरिक श्रम करणाऱ्याने एखादें चांगलें पुस्तक वाचून आपली करमणूक करावी. मानसिक श्रम करणाऱ्यानें मोकळ्या हवेंत खेळ खेळून आपली