पान:आरोग्यविज्ञान.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ येऊन तीं दबलीं गेलीं, म्हणजे त्यांचा कांहीं भाग कुजूं लागण्याचा संभव असतो. हाच क्षयरोग. व्यायामानें शरीरांतील सर्व स्नायूंना चलनवलन मिळतें, व ते आपआपले काम करण्यास समर्थ होतात; शरीरांतील सर्व भागांकडून रक्ताची जास्त मागणी होते, पचनेंद्रियेंही जास्त रक्त तयार करूं लागतात, व शरीरांत केवळ जमाखर्चाची तोंडमिळवणी न होतां जोमरूपी शिल्लक पडते, शरीर काटक बनतें, कमजास्त श्रम पडले तरी तें कुरकुर करीत नाहीं, रोगांना तोंड देतें, व पुष्कळ दिवस टिकतें. एखादी सतार अगर बायसिकल रिकामी पडूं दिली, तर गंजून लवकरच निकामी वापरांत ठेविली तर पुष्कळ दिवस टिकते. तील स्नायूंना व्यायाम झाला नाहीं, तर ते होते; तीच नेहमी त्याचप्रमाणे शरीरां- क्षीण होत जातात; म्हणजे पुष्ट व चिवट पण त्यांना नियमित चलनवलन मिळालें होतात. तेव्हां शरीराला अगदीं श्रम होऊ न देण्याची जी कित्ये- कांची प्रवृत्ति असते ती फार घातुक आहे. व्यायामाकडे बाळपणीं उपयोगी नाहीं, कारण व तरुणपणीं तर बिलकुल दुर्लक्ष्य करितां ह्या वयांत शरीर जोमानें वाढत असतें, या वयांत घातलेल्या शारीरिक पायावरच शरीरांतील जोम व त्याचा टिकाऊपणा- म्हणजेच आयुष्य-अवलंबून असतें. ह्या वेळींच जर प्रकृति नाजुक व तोळामासा असली तर पुढे वाढ खुंटली व जोम वाढण्याच्या ऐवजी कमी होऊं लागला, म्हणजे ती कितीसा व असली प्रकृति क्षुल्लक कारणानें बिघडली तर त्यांत नवल तें काय ? तर मुलांनो, पुढील आयुष्य झाडांजनावरांप्रमाणें न जातां टिकाव धरणार ?