पान:आरोग्यविज्ञान.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७ त्यामुळें तीं आपलें काम बेताचेंच करितात, जें रक्त तयार होतें त्याचा बराच भाग मेंदूकडे खर्चिला जातो व बाकीच्या भागांचें पोषण व वाढ व्हावी तशी होत नाहीं. ह्याचा परिणाम पचनेंद्रियां- चरही होतो. रक्त कमी तयार होऊं लागतें, मेंदूकडील रक्तांतही कमीपणा येतो व मेंदूचें कामही नीट चालत नाहीं. व्यायाम झाल्यानें त्वचा व फुप्फुसे यांनीं जी घाण काढून टाकली जाते ती व्यायाम न झाल्याने शरीरांतच सांचून राहते. व्यायामाचा फुप्फु- सांवर आणखी एक परिणाम होतो तो असा. आपल्या पाठीचा कणा ही एक हाडांची सांखळी आहे हें मागें सांगितलेच आहे. ती सांखळी आहे, एक हाड नाहीं, ह्मणूनच आपल्याला चारी बाजूंनीं वांकतां येतें. ही सांखळी पाठीच्या बाजूपेक्षां पोटाच्या बाजूकडे सहज वांकते, इतकेंच नव्हे तर तशी वांकण्याकडे तिची प्रवृत्तीच दिसते. कारण साहजिकपणे आपण पोंक काढून बसतों, ताठ बसावयाचें तें मुद्दाम बसावें लागतें. पण ह्या पोंकाचा फुप्फु- सांवर वाईट परिणाम होतो. फुप्फुसें स्पंजासारखी असल्यामुळे पोंक काढल्यानें तीं दबली जातात. दबलीं म्हणजे त्यांत हवा कमी भरून रक्तशुद्धीचें काम नीट होत नाहीं. तेव्हां नेहमीं प्रयत्न करून ताठ बसलें पाहिजे. रोज व्यायाम केल्यानें फुप्फुसें हवेनें पूर्णपणें भरलीं जाऊन, कण्याच्या पुढें वांकण्याच्या प्रवृत्तीस चांगला प्रतिबंध करतात, व अर्थात् रक्तशुद्धीचें काम नीट रीतीनें चालतें. रोज व्यायाम करणान्या मनुष्याची छाती भरलेली दिसते त्याचें कारण हेंच. फुप्फुसें हवेनें पूर्णपणे भरलीं नाहींत, पोंक