पान:आरोग्यविज्ञान.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ आपण होऊन व्यसनांनीं आपली प्रकृति खराब करून न घेतली, तर ती निरोगी व सशक्त राहते. पण लेखणीवर ज्यांची उपजी- विका असते अशा लोकांना, व अभ्यासांत ज्यांचा बहुतेक वेळ जातो अशा विद्यार्थ्यांना, व्यायामाचे महत्त्व समजून सांगावें लागतें. यांपैकीं कांहीं असाही दुराग्रह घेऊन बसतात की, 'आ- म्हाला व्यायाम करून काय करावयाचें ? आमचें जीवित लेखणीवर, आम्हाला लप्करी पेशा पत्करावयाचा नाहीं व कोणाशीं कुस्तीहि करावयाची नाहीं. आमचें शरीर नीट चाललें ह्मणजे झालें.' ह्या दुराग्रहाचें कारण अज्ञान होय. शरीर नीट चालण्यास व त्यामध्यें काम करण्याची कुवत पुष्कळ दिवस टिकण्यासच व्यायाम आव- श्यक आहे. तो कसा तें पाहूं. व्यायामामुळे सर्व शरीरास चलन मिळतें, व श्वासोच्छ्वास नेहमीं जो मिनिटास १६ पासून २० वेळां होत असतो तो त्याहीपेक्षां पुष्कळ जलद चालतो. अर्थात्, रक्तशुद्धीचें काम उत्तम प्रकारें होतें, व आंगांतून खूप घाम येऊन व फुप्फुसांच्या द्वारें, शरीरांतील घाण बाहेर निघून जाण्याचें काम एरव्हींपेक्षां जास्त जोरानें चालतें. पचनेंद्रियांना चलन मिळून जास्त रक्त तयार होतें व अन्नांतील सर्व सत्व शोषून घेतलें जातें. नेहमीं शरीरांतील ज्या भागाला काम जास्त त्या भागाचें पोषण करण्याकरितां व झीज भरून काढण्याकरितां रक्त तिकडे जास्त धांवतें, अर्थात् बाकीच्या भागांकडील कमी होतें. मानसिक श्रम करणाऱ्या लोकांच्या मेंदूकडे रक्त जास्त वहात असतें व ह्याच बहाण्याचा मेंदूवर जास्त दाब झाला की आपले कपाळ दुखूं लागतें. अशा लोकांनीं व्यायाम न केला तर पचनेंद्रियांस चलन न मिळा-