पान:आरोग्यविज्ञान.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५ तयार करणें हें पचनेंद्रियांचे काम आहे. हें काम नीट चालतें कीं नाहीं हें पाहाणें ही पहिली महत्त्वाची गोष्ट होय. तें समजण्याचें साधन मलशुद्धि. मलशुद्धि रोज नियमाने व्हावी तशी होते कीं नाहीं हें पाहाणें हा आरोग्याचा पहिला नियम होय. जेवण्याच्या वेळी भूक लागते कीं नाहीं ह्यावरूनही पचन नीट होतें कीं नाहीं हें समजतें. भूक न लागतां उगाच खाल्ल्यानें उपाय न होतां अपाय होतो. पोटाला भार वाटे इतकें एकदम खाऊं नये. जेवणानंतर ढेंकरा येणें, मळमळणे, घशाशीं जळजळणें हीं अपचनाचीं चिन्हें होत. पोटांत वात धरतो तोही अपचनामुळेच. हें सर्व आप- त्याला न होईल अशी खबरदारी घेतली पाहिजे. वर सांगित- लेले, शरीरानें दिलेले हे इशारे होत. त्यांच्याकडे वेळीच लक्ष्य दिल्यानें रोग होणें टळते. जेवणसुद्धां प्रत्येक गोष्ट नेमलेल्या वेळी करण्याची शिस्त शरीराला लावून दिली पाहिजे. मेहनत झाल्यावर घाम जिरून शरीर पूर्ववत् स्थिर होईपर्यंत जेऊं नये. अशा रीतीनें पचन नीट होतें कीं नाहीं हें पाहिलें, म्हणजे नवीन रक्त तयार होणें व घाण मलमूत्ररूपानें निघून जाणें, ह्या गोष्टींची व्यवस्था लागली. नंतर विचार फुप्फुसें व त्वचा यांचा. फुप्फुसांनी रक्त शुद्ध होतें व विषारी वायु बाहेर काढून दिले जातात, व त्वचा घामाच्या रूपानें घाण बाहेर काढून टाकते. हीं कामें नीट चालण्याकरितां व्यायाम व आंघोळ हे उपाय होत. प्रथम व्यायामासंबंधीं विचार करूं. शारीरिक काबाडकष्ट करून जे पोट भरतात अशा लोकांना व्यायाम करा म्हणून सांगण्याची जरूर पडत नाहीं. त्यांना साहजिकच व्यायाम होतो, व त्यांनी