पान:आरोग्यविज्ञान.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ त्याला काय धाड भरली आहे ? त्याची लांबी तितकी रुंदी.' कोणी आपण दहा पोळ्या खातों ह्याच गुर्मीत. सारांश, कोणी बाह्य रूप- रंगावरूनच प्रकृतीची अटकळ बांधतो, तर कोणी शरीराच्या निर- निराळ्या भागांचा परस्पर संबंध विसरून जातो. वास्तविक, जेव्हां आपली सर्व इंद्रिये आपापले व्यापार आपणांस कांहीं एक त्रास, यातना, किंवा अस्वस्थता उत्पन्न न करितां चालवीत असतात तेव्हांच आपण निरोगी आहोंत असें समजावें. जो मनुष्य पूर्णपणें निरोगी आहे त्याचे अवयवही प्रमाणयुक्त व अर्थात् सुंदर अस- लेच पाहिजेत. आरोग्याचे सामान्य नियम. मार्गे सांगितलेच आहे की आपले शरीर फार खुबीनें बनवि- लेलें आहे. स्वच्छ हवा व चांगलें अन्न यांचा पुरवठा त्याला केला की पोषण, वाढ, झीज भरून काढणें व घाण काढून टाकणें ह्रीं सर्व कामें तें आपलें आपण करितें हें काम इतकें सुरळीत- पणें चालतें म्हणूनच तें कसें चालतें ह्याकडे आपण लक्ष्य देत नाहीं. ह्या कामांत कोठें व्यत्यय आला कीं शरीर आपल्याला अख- स्थतारूपी इशारा देतें, व आपलें लक्ष्य तिकडे वेधतें. तसें न होईल, व लक्ष्य देण्यांत आपली हयगय होईल, तर रोगरूपी दंड आपल्याला होतो. तेव्हां शरीरांतील व्यापारांवर नजर ठेवणें व इशाऱ्यानें जागे होऊन लगेच उपाय करणें, एवढेच आपलें कर्तव्य आहे. शरीरांतील कार्ये रक्तावर अवलंबून असतात, व रक्त