पान:आरोग्यविज्ञान.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ भाग ५. शरीराची निगा. खरी संपत्ति म्हटली म्हणजे निरोगी व सशक्त शरीर आणि त्यांत सुविचारी व जोमदार मन हीच होय. बहुतेक लोकांना ह्या संपत्तीशिवाय दुसरी संपत्ति - म्हणजे सोनें, रुपें - साध्य नसते. ह्या लोकांची उपजीविका शारीरिक श्रम व थोडी कुशलता ह्यांवरच अवलंबून असते. मनुष्य श्रीमंत असला तरी, शरीर प्रकृति सुदृढ नसल्यास, त्या श्रीमंतीपासून त्याला सुख मिळत नाहीं. विद्वा- नाला आपल्या विद्वत्तेचा उपयोग, शरीरप्रकृति चांगली असल्या- शिवाय, लोकांना पुष्कळ वर्षे करून देतां येत नाहीं. पुन्हा, पैसा व विद्वत्ता यांप्रमाणें, शरीराचें आरोग्य व सामर्थ्य दुर्लभ नसून सुलभ आहे. तर सर्व ऐहिक खटाटोप ज्याच्या साहाय्यानें चालतो तें हें शरीर कसें चालतें, व तें निरोगी व सशक्त कसें राखावें, हें समजून घेणें व त्याप्रमाणें वागणें अत्यावश्यक नाहीं काय ? - मी रोगी की निरोगी ? आपली प्रकृति निरोगी आहे किंवा नाहीं हें फारच थोड्या लोकांना समजतें. कारण निरोगी असल्याचे लक्षण काय हें पुष्क- ळांस माहीत नसतें. एक म्हणतो 'आपली आहे, मात्र थोडासा वाताचा विकार आहे.' फक्त अवष्टंभाचा त्रास आहे, बाकी ठीक.' प्रकृति अगदी निरोगी दुसरा म्हणतो 'मला कोणी म्हणतो 'अरे,