पान:आरोग्यविज्ञान.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ एका भागाचें काम रोगजंतूंचा नाश करण्याचें असतें. जाठर- रसाचाही ह्या कामी उपयोग होतो. लंघन केलें ह्मणजे पचनेंद्रियांना थोडी विश्रांति मिळते व रोगजंतूंचा नाश करण्याचें रक्ताचें काम जास्त जोमानें चालतें. अपचन वाटलें कीं लंघन हें बिनखर्चाचें पण त्वरित गुण देणारें औषधच होय. मात्र ह्याचा अतिरेक होतां कामा नये; नाहीं तर नवीन रक्त बनविण्याच्या कामांत व्यत्यय येऊन शरीरव्यापार नीट चालणार नाहींत, व शरीरांतील जोम कमी होईल. केव्हांही भुकेनें जीव घाबरा होईपर्यंत अन्नाचा पुरवठा करण्याचे थांबतां कामा नये. लंघनानंतर खाणें ही हलकें व बेताचेंच पाहिजे, ह्मणजे पचनेंद्रियांवर तीं आपलें काम हळूहळू करूं लागतात. अति निकट संबंध असल्यामुळे उपवास-निमित्तानें चित्तशुद्धीचे उपाय आपण केले तर शरीराचा त्यांत फायदाच होतो; कारण शरीराचें अतिशय नुकसान मनाच्या उच्छृंखळपणामुळेंच होत असतें. तेव्हां प्रकृतिमानाप्रमाणें आठ अगर पंधरा दिवसांनीं उपवास करणें शरीराला व मनाला दोहोंनाही हितावह आहे यांत शंका नाहीं. एकदम भार न पडतां मन व शरीर यांचा