पान:आरोग्यविज्ञान.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१ आपल्यांतील मध्यम वर्गाच्या लोकांचें अन्न पाहिलें असतां शरीरास लागणारीं सर्व द्रव्यें त्यांत असतात असें आढळून येईल. शक्य तर आहारांतील दुधाचें प्रमाण वाढविलें पाहिजे, फलाहाराची जोड त्यास दिली पाहिजे व अन्नांत नेहमीं फेरबदल केला पाहिजे. अन्न सावकाश खाल्लें पाहिजे; कारण पचनास चर्वणाची व लाळेची जरूर असते. लवकर कोण जेवतो ह्याची शर्यत लावतां कामा नये. पदार्थ पुन्हा मिळणार नाहीं ह्मणून कसा तरी पोटांत ढकलतां कामा नये. थंडगार, अति कढत अगर शिळें अन्न खाऊं नये. जेवतांना खदखदां हांसणें, आरडाओरडा करणें, संतापणें, गहन विचार करणें वगैरे वर्ज्य करावें. तोंड वाईट करून पदार्थ खाण्यांत कांहीं हांशील नाहीं, कारण तसें केल्यास पदार्थाचें नीट पचन होत नाहीं. मन आनंदांत ठेवावें. जेवणानंतर सुमारे अर्धा तासपर्यंत शारीरिक अगर मानसिक श्रम करूं नयेत, त्यांनीं पचनास अडथळा होतो. अन्नांत सर्व द्रव्यें योग्य प्रमाणांत मिसळलेलीं असलीं पाहिजेत. तेल, तूप फार खाल्यास दोंद वाढून जठर व स्नायु कमकुवत होतात. तसेंच मीठ, लिंबू, दहीं वगैरे पदार्थ अगदीं कमी प्रमाणांत खाल्ले तर रक्त कमकुवत होतें व रक्तदोषादि विकार जडतात. उपवास दोन तऱ्हेचा असतो. बहुतेक लोकांचा उपवास ह्मणजे अन्नाचा फेरबदल होय. असा फेरबदल करणें, अगर फलाहार करणें, इष्ट आहे हें वर सांगितलेंच आहे. दुसन्या तन्हेचा उपवास ह्मणजे लंघन किंवा कांहींही न खाणें आपल्या रक्तांतील