पान:आरोग्यविज्ञान.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० ह्मणजे जो मल पडतो, तो पिंवळसर रंगाचा असून, मऊ, घट्ट व बांधीव असतो, व त्याला सर्व बाजूंस एक प्रकारचा बुळबुळीत पदार्थ लागलेला असतो. शिवाय मल अशा अवस्थेत शरीराबाहेर पडतो कीं, त्याच्या संपर्कानें मलद्वार मुळींच खराब होत नाहीं. त्याचप्रमाणें मलास फार घाणही येत नाहीं, व वायुही धरत नाहीं." अन्नपचन बरोबर होत नसलें तर कधीं कधीं मलावरोध होतो. साधें जेवण पचण्याला सुमारें चार तास लागतात. जेवल्या- नंतर पोटाला थोडी विश्रांति देणें इष्ट असतें. म्हणजे दिवसा पांच सहा तासांनीं शरीराला अन्नाचा पुरवठा पुन्हा केला पाहिजे. मध्यें अति वेळ जाऊं देणें इष्ट नाहीं व इकडून आला खा, तिकडून आला खा, असें करणेंही इष्ट नाहीं. एकदम खूप जेवणें अगर पुन्हा पुन्हा खाणें ह्या दोन्ही अतिरेकांनीं पचनेंद्रियें विघडतात. रात्रीं निजावयाच्या पूर्वी निदान एक तास जेवण झालेलें पाहिजे; कारण झोपेच्या वेळीं मेंदू विश्रांति घेतो, ह्मणून पचन नीट चालत नाहीं. ह्या वेळीं जडान्न घेऊं नये व भुकेपेक्षां दोन घास कमी खाण्याचा नियम विशेष ध्यानांत ठेवावा, ह्मणजे झोंप गाढ येते व स्वप्ने वगैरे पडत नाहींत. अन्न नीट शिजविलें पाहिजे. भांडीं खच्छ, व तांब्या पितळेचीं असल्यास, चांगल्या कल्हईचीं असावीत. अन्न शिजवितांना फार पाणी घालून कडावाटे अन्नाचें सत्त्व बाहेर घालवू नये. शिजविल्यानें अन्न मृदु, चवदार व पचनास हलकें होतें. लवकर शिजणारे, व विशेष तिखटमीठ न घालतां चवदार लागणारे, पदार्थ पचनास चांगले असा साधारण नियम आहे.