पान:आरोग्यविज्ञान.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९ काळजीपूर्वक पाहिलें पाहिजे, तसेंच, किंबहुना जास्त काळजीनें, मासे, मांस वगैरेची परीक्षा मांसाहारी लोकांनी केली पाहिजे.' वरील प्रत्येक प्रकार शरीरांत लागणाऱ्या एकेका द्रव्याकरितां योजलेला आहे. कांहीं पदार्थात एकाहून अधिक द्रव्यें सांपडतात, म्हणून पुन्हा पुन्हा आलेले आहेत. दूध हा एकच पदार्थ असा आहे कीं त्यांत शरीराला लागणारी सर्व द्रव्ये एकवटलेली सांप- डतात. उत्तम अन्न ह्मणजे वरील पांचही प्रकार ज्यांत आहेत तें. पण हें ध्यानांत ठेवलें पाहिजे कीं पुष्टि, उत्तम प्रकारचें अन्न खाण्यावर नव्हे, तर त्याच्या पचनावर अवलंबून असते. पदार्थ चांगल्या द्रव्यांनी युक्त असून पचनास जितका हलका असेल तितका चांगला. मीठमसाला घालून, अगर तूप साखर घालून, चमचमीत केलेले पदार्थ पचनास जड असतात. तेव्हां त्यांच्या पचनास वेळ लागतो, व तितका वेळ पुन्हां खाण्याचे आपण थांबत नाहीं, त्यामुळे अपचन होतें, व अपचनापासूनच बहुतेक रोगांची उत्पत्ति असते, कारण अपचन झालें म्हणजे शरीरांत विजातीय द्रव्य सांचतें, व विजातीय द्रव्यामुळेच रोग होतात. तेव्हां पुष्कळ खाण्याकडे नव्हे, तर खाल्लेलें पचलें कीं नाहीं याकडे, आपले लक्ष्य असले पाहिजे. आपल्यांतील जेवणांत आग्रह करण्याची चाल अनिष्ट आहे. तूपसाखर खाणाऱ्या बऱ्याच श्रीमंतांपेक्षां जाडेभरडे अन्न खाणाऱ्या मजुराची शरीरप्रकृति जास्त चांगली असते यांतील इंगितही हेच. अन्नपचन नीट झालें कीं नाहीं हें समजण्याचें साधन मलशुद्धि होय. "आपलें अन्नपचन उत्तम प्रकारें होत असलें