पान:आरोग्यविज्ञान.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ तें ठरवितात. मनुष्याच्या उत्पन्नाकडे बघण्याची रीतही हीच. त्याचप्रमाणें त्याच्या शारीरिक स्थितिकडेही - विशेषतः बाल्यावस्थेत च तारुण्यांत - बघितलें पाहिजे. असो. ह्या सगळ्याचें मूळ अन्न आहे तेव्हां त्याचा विचार करूं. शरीरांतील निरनिराळे भाग रक्तांतील निरनिराळ्या द्रव्यांचा उपयोग करून घेतात. तेव्हां हीं सर्व द्रव्यें ज्या अन्नांतून मिळू शकतील असें अन्न खाल्लें पाहिजे. शाकाहारी लोकांच्या दृष्टीनें अशा अन्नाचे पांच प्रकार करितां येतात:- ( १ ) वाटाणा, घेवडा, दूध, गहूं, दहीं, तुरीची व चण्याची डाळ (बाजरी, ज्वारी, मका ह्यांतच येतात ). (२) बटाटे, आरारूट, तांदूळ, साबुदाणा, गहूं, दूध, साखर, द्राक्षे. ( ३ ) लोणी, तीळ वगैरेंचें तेल, कवचयुक्त फळें, ह्मणजे बदाम, पिस्ते, अक्रोड वगैरे. (४) मीठ, दूध, फळें, भाजीपाला . (५) संत्री, लिंवें, मनुका, बेदाणा वगैरे. मांसाहारी लोकांच्या दृष्टीनें वरील पहिल्या प्रकारांत अंडी, सागोती, मासे, पक्षी, बदकें ह्यांची भर घातली पाहिजे. तसेंच तिसऱ्या प्रकारांत प्राणिज चरबीचा समावेश केला पाहिजे. बाकी सर्व प्रकार व त्यांतील पदार्थ शाकाहारी व मांसाहारी ह्या दोहोंनाही साधारणच आहेत. भाजीपाला, फळफळावळ ताजी आहे कीं कुजूं लागली आहे हें शाकाहारी लोकांनीं जसें