पान:आरोग्यविज्ञान.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७ भाग ४. -- अन्न. पहिल्या भागांत सांगितलेंच आहे कीं शरीरांत कोणतीहि क्रिया घडली, नुसती पापणी उचलली किंवा विचार केला कीं, त्या क्रियेमुळे शरीरांतील कोणता तरी भाग झिजतो. तेव्हां शरीर पुष्कळ दिवस टिकावें व त्यांतील प्रत्येक भागानें आपापले काम योग्य रीतीनें बजावावें याकरितां झिजलेला भाग भरून आला पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे, आंगांत उष्णता व जोम हींहि उत्पन्न झाली पाहिजेत. योग्य तऱ्हेचें अन्न खाऊन त्याचें नीट पचन होऊन सकस रक्त तयार झालें व त्याच्या शुद्धतेचें काम फुप्फुसांकडून नीट रीतीनें झालें ह्मणजे हें कार्य होतें. बाल्यावस्थेत व तारुण्यांत शरीर वाढत असतें व उतार- वयापेक्षां खर्चीही कमी पडतें. खर्चाइतकी जमा झाली कीं नाहीं, याकरितां या वयांत केवळ जेमतेम शरीर चाललें आहे कीं नाहीं एवढेंच पाहून चालत नाहीं; तर खर्चापेक्षां जमा जास्त आहे कीं नाहीं, हाडें, स्नायु वगैरे जोमानें वाढत आहेत कीं नाहींत ह्या गोष्टींकडेही लक्ष्य दिलें पाहिजे. नवीन गिरणी काढली व तिची पैदास जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याइतकी झाली ह्मणजे गिरणीची स्थिति समाधानकारक आहे असें कोणी ह्मणत नाहीं; तर तिची गंगाजळी वाढते आहे कीं नाहीं, एक दोन सालीं बूड सोसूनही गिरणी तगेल कीं नाहीं ह्यावरून