पान:आरोग्यविज्ञान.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ मोकळ्या हवेंत ठेवावें, व त्यांत ऑक्सिजनसारखे हवेंतील चांगले वायु विरूं देऊन, मग गाळून घ्यावें, म्हणजे कांहींतरी बरें. कांहीं लोक कॅर्बोनिक अॅसिड वायु आंत मुद्दाम विरविलेले पाणी, ह्मणजे सोडा वॉटर, हेंच पाण्याऐवजी वापरतात. औषध या दृष्टीनें हें योग्य आहे, पण ही नेहमींची गोष्ट होऊन बसणें ह्मणजे, पाय कवेना म्हणून कुबडी वापरली ती पाय बरा झाल्यानंतरही कायम ठेवली व पाय कायमचाच निःशक्त करून टाकला, अशासारखें आहे. तहान भागविण्याकरितां पेय ह्मणजे सृष्टिनिर्मित, शुद्ध, थंड पाणी हेंच होय. नेहमीं व्यवहारांत आपण कितीतरी पाणी वापरून खराब करीत असतो. हें पाणी घराजवळच जमिनींत जिरूं दिलें अगर उघड्या गटारांतून व नाल्यांतून बाहूं दिलें तर सूर्याच्या उष्णतेनें तें तापून त्यांतून विषारी वायु निघतात व हवा रोगट करितात. हें पाणी जिरून तें कधीं कधीं विहिरींतील झरेही दूषित करितें. तेव्हां हें खराब पाणी दगडी गटाराने घरापासून दूर नेऊन, त्याचें खत करणें, अगर अन्य उपायानें त्याची योग्य विल्हेवाट लावणें आवश्यक आहे. मोठ्या शहरांतून, पुष्कळ पैसे खर्चून रस्त्यांच्या खालून पोकळ दगडी गटारें बांधून हें पाणी शहरांतून काढून लावण्याची व्यवस्था करितात, व शहराच्या आरोग्याकरितां ही गोष्ट खच्छ पाण्याच्या पुरवठ्याइतकीच अगत्याची समजली जाते. पिसवा, चिलटें जेथें जेथें असतात तेथें तेथें हें खराब पाणी काढून लावण्याची योग्य व्यवस्था केली म्हणजे तीं नाहींशीं होतात असा अनुभव आहे. -0----