पान:आरोग्यविज्ञान.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ भाग ३. पाणी. पृथ्वीचा तीनचतुर्थांश भाग पाण्यानें व्यापलेला आहे. आपलें शरीर शेंकडा नव्वद भाग पाण्याचें बनविलेले आहे. झाडांची वाढ पाण्यावर अवलंबून असते. सूर्याच्या उष्णतेनें समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ढग बनतात व पाऊस पडतो. पावसाचें पाणी कांहीं जमिनीत जिरतें व झन्यांवाटे तळीं, विहिरी ह्यांत उतरतें, पण बराच भाग पृथ्वीच्या जाऊन नद्यांच्या द्वारा समुद्रास मिळतो. परंपरा आहे. · पृष्ठभागावरून वहात अशी ही चक्रासारखी पाण्यांत बहुतेक पदार्थ, वायु देखील, विरतात. तेव्हां अगदीं शुद्ध पाणी मिळणें मुष्कील. तथापि मोकळ्या मैदानावर चांगला पाऊस पडून हवा स्वच्छ झाल्यानंतर जमविलेलें पावसाचें पाणी बरेंच शुद्ध असतें. पाण्यांत दोन तऱ्हेचे मल सांचण्याचा संभव असतोः धूळ वगैरे दिसणारे मल व जिप्सम, चॉकसारखे विरलेले वाईट पदार्थरूपी न दिसणारे मल. पाणी प्यावयाचें असेल तर दिसणारा मल फिल्टरनें काढून टाकावा. १० शेर पाण्यांत ३ गुंजा ह्याप्रमाणें तुरटी घातल्यास गढूळ पाणी खच्छ होतें व गाळ खालीं बसतो. कोळसा व रेती यांच्या थरांतून पाणी झिरपूं देणें ही एक १ जिप्सम अगर चॉक (खडू) पाण्यांत विरलेले असल्यास पाणी पचनास जड होतें.