पान:आरोग्यविज्ञान.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ फिल्टरची तन्हा आहे; अगर मडकें, खुजा यासारख्या सूक्ष्मच्छि- द्रयुक्त पात्रांतून पाणी झिरपूं देणें ही एक जास्त चांगली तहा आहे. मात्र कोणच्याही तन्हेचें फिल्टर वापरले तरी त्याच्या स्वच्छतेबद्दल विशेष खबरदारी बाळगली पाहिजे, नाहींतर फायद्या- ऐवजी नुकसान मात्र होईल. ज्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल आपली पक्की खातरी नाहीं असें जंगलांतील, दलदलींतील, अगर इतर ठिकाणचे पाणी फिल्टर करून पिणेंच इष्ट असतें. पण एवढ्यानेंच भागत नाहीं. कांहीं ठिकाणचें पाणी दिसण्यांत अगदीं निर्मळ असतें, पण त्यांत विषारी वायु वगैरे बिरलेले असतात. असलें पाणी चांगले उकळून नंतर फिल्टर केलें पाहिजे, म्हणजे पिण्यास योग्य होतें. उकळण्यानें रोगकारक जंतूही असल्यास नाश पाव- तात. आणखी कांहीं प्रकारच्या पाण्यांत घनपदार्थ विरलेले अस- तात. हें पाणी उकळून फिल्टर केलें तरी पिण्यास बेचव अगर खारट व पचनास जडच असतें. ह्या पाण्याशिवाय पाणीच प्याव- यास नसेल तर त्याची वाफ करून त्या वाफेचें पाणी करून पिणें हाच उपाय आहे. पण इतकी वेळ बहुधा येत नाहीं. पाण्यांत विरलेले सर्वच पदार्थ अपायकारक असतात असें नाहीं, कांहीं आरोग्यकारकही असतात. फुप्फुसांना केवळ विषतुल्य असा कॅर्बानिक अॅसिड वायु पाण्यांत विरून पोटांत गेला तर पचनक्रि- येस मदत करतो. कांहीं ठिकाणचें पाणी विशेष पाचक व पुष्टि- कारक आहे असें आपण म्हणतों त्याचें कारण तरी हेंच कीं त्यांत पचनक्रियेस हितकारक अशीं द्रव्यें विरलेलीं असतात. शरीरांत रक्त केंसासारख्या बारिक नलिकांतून वहात असतें.